कॅनरा बँकेची 1 कोटींची फसवणूक, साकेत तलवारला अटक

याआधीही अशाच आठ गुन्ह्यांमध्ये तलवार यांना अटक करण्यात आली होती
Saket Talwar arrested for cheating bank
Saket Talwar arrested for cheating bank Dainik Gomantak

हैदराबाद सेंट्रल क्राइम स्टेशन (CCS) ने मंगळवारी गोव्यात कुख्यात फरारी घोटाळेबाज साकेत तलवार याला अटक केली. हैदराबाद येथील नारायणगुडा शाखेच्या कॅनरा बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाच्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.

बनावट कागदपत्रे बनवून कॅनरा बँकेची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सेंट्रल क्राईम स्टेशन पोलिसांनी तलवार कार्स प्रायव्हेट लिमिटेडमधून साकेत तलवारला अटक केली.

Saket Talwar arrested for cheating bank
गोवा पोलीस दलात बदल्यांचं सत्र सुरुच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमधील पट्टेला श्रीनिवास गौतम आणि पट्टेला सैलाजा यांनी तलवार कार्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून व्होल्वो कार घेण्यासाठी कर्जासाठी बँकेशी संपर्क साधला. तलवार कारच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा झाली तेव्हा, तलवार यांनी गौतम आणि शैलजा यांच्या संगनमताने कार वितरणाची बनावट कागदपत्रे बनवली, निधी वळवला आणि बँकेत बनावट कागदपत्रे सादर केली, असे पोलिसांनी सांगितले.

हैदराबाद आणि सायबराबाद पोलिस आयुक्तालयात याआधीही अशाच आठ गुन्ह्यांमध्ये तलवार यांना अटक करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध CCCS मध्ये आणखी तीन गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com