वाढत्या शहरीकरणामुळे साळ नदीच्या खोऱ्याला भविष्यात पुराचा धोका

वनाचे आच्छादन कमी होत असल्याची माहिती अभ्यासात स्पष्ट
Sal River
Sal RiverDainik Gomantak

मडगाव : सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या साळ नदीच्या खोऱ्यावर वाढत्या शहरीकरणाचा परिमाण दिसू लागला असून यावर आताच उपाय न घेतल्यास येत्या 20 वर्षातच हा परिसर पुराच्या चपेट्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या खोऱ्यावर केलेल्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. वाढत्या लोकवस्ती आणि इतर प्रकल्पामुळे या नदीच्या किनाऱ्यावर असलेली झाडी मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली असून भविष्यात त्याचाच फटका या परिसरात बसण्याची शक्यता आहे.

Sal River
गोव्यात सागर मित्र भरतीसाठी कोकणी सक्तीची करा : विजय सरदेसाई

साळ नदीचे हे खोरे एकूण 37 किलोमीटरचे असून त्याच्या काठावर नुवे, वेर्णा, नागवा, आरोसी, वेळसाव, कुयेली, कोंसूवा, केसरवाळ, डोंगरी आणि गवनळी हे गाव वसले असून कासावली आणि उतोर्डा या गावाच्या सीमा जोडल्या आहेत. या नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून त्यामुळे काही ठिकाणी या नदीचा प्रवाहही बदलला आहे.

साळ नदीवर शहरीकरण आणि हवामान बदल यांचा परिणाम यावर हा अभ्यास असून त्यात आश्विनी पै पानंदीकर, शुभम गुडे, ए. जी. चाचडी, महेंद्र कोथा यांनी भाग घेतला होता. स्कुल ऑफ अर्थ सायन्स, गोवा विद्यापीठ आणि जलस्त्रोत खात्याच्या वतीने हा अभ्यास केला होता. अर्थ सायन्स इंडियाच्या ई जर्नलमध्ये हा अहवाल प्रसिद्ध झाला असून या खोऱ्यातील जमिनीचा वापर यावरही हा अभ्यास आहे.

Sal River
उद्योगांना फक्त दीड महिन्यांत देणार चालणार

वाढत्या शहरीकरणाचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो याचे भाकीत या अहवालात असून त्यासाठी वेगवेगळ्या कालखंडाचा विचार केला गेला आहे. 1993 मध्ये या नदीचा काठ 45 टक्के जंगलाने तर 24 टक्के शेतीने व्यापला होता. आता ज्या वेगाने या भागात शहरीकरण वाढते ते पाहिल्यास 2040 पर्यंत जंगलाचा भाग 5.93 टक्क्यांनी कमी होणार असून लोकवस्तीची जागा 4.34 टक्क्यांनी वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. असे झाल्यास नदीच्या काठाची मोठ्या प्रमाणावर धूप होणार आणि त्यामुळे नदीच्या प्रवाहाची गती वाढणार आणि पुरसदृश स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करून हे टाळण्यासाठी नदीच्या काठाची होणारी धूप थांबविण्या बरोबर नदीतील गाळ वेळोवेळी उपसण्यासारखे उपाय घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com