''साळ नदी पुनरुज्जीवन प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार''

''साळ नदी पुनरुज्जीवन प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार''
saal2.jpg

सासष्टी : गोव्यातील (goa) तिसऱ्या क्रमांकाच्या लांबीची साळ नदी (sal river) गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेली असून ही नदी हरित लवादाने प्रदूषित (Polluted) म्हणून जाहीर केली आहे. या नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी सुमारे 16.81 कोटी रुपये खर्च करून मडगाव घाऊक मासळी मार्केट ते वार्का पूल या 8.26 किलोमीटरपर्यंत साळ नदी उपसण्याचे तसेच पुनरुज्जीवित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री फिलिप नेरी रॉड्रीगीस ( Filipe Nery Rodrigues) यांनी दिली. (Sal River Rehabilitation Project to be completed by December)

सासष्टी तालुक्यात असलेल्या साळ नदीला एकेकाळी जीवनवाहिनी मानली जात होती, पण सध्या गोव्यातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून ती गणली जात आहे. नदीत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नदीच्या प्रवाहावर रोख लागला असून सर्वप्रथम जीसेबीद्वारे कचरा काढून पाण्याचा योग्य प्रवाह सुरळीत करण्यात येत आहे. नदीत काही दिवसांपूर्वी सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्वरित पाहणी करण्यात आली. साळ नदी स्वच्छ करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत असून साळ नदी स्वच्छ करण्यासाठी आपणही प्रयत्न करीत होतो, असे मंत्री फिलिप नेरी रोड्रीगीस यांनी सांगितले. 

संपूर्ण देशात फोफावलेल्या कोरोना व्हायरसमुळे (covid19) आर्थिकरित्या ताण निर्माण झालेला आहे तरीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (pramod sawant) यांनी आर्थिक तणावातही साळ नदी उपसण्याचे तसेच पुनरुज्जीवित करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. गोव्याच्या 34 व्या घटकराज्य दिनाच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) साळ नदी पुनरुज्जीवित व कोलवा समुद्र किनाऱ्यावर असलेले क्रीक विकसित करण्याच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. साळ नदी उपसण्याबरोबर सुमारे 9.13 कोटी रुपये खर्च करून कोलवा समुद्र किनाऱ्यावर असलेल्या क्रीक विकसित करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आले आहे, असे  मंत्री फिलिप नेरी रोड्रीगीस यांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com