साळावलीच्या पर्यटन स्थळाला कुलूप

Dainik Gomantak
गुरुवार, 14 मे 2020

माडेल साळावली भाग हा चांगले  पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला न येता अनैतिक प्रकार करण्याचे ठिकाण म्हणून अधिक नावलौकिक मिळविले आहे. एका बाजूने जंगल दुसऱ्या बाजूने जलाशय व मध्ये जलसंपदा खात्याने करोडो रुपये खर्चून कृत्रिम बेट तयार केले आहे.

 

मनोदय फडते

सांगे

साळावली धरणाच्या जलाशय काठावर माडेल साळावली येथील जलसंपदा खात्याने करोडो रुपये खर्चून तयार केलेले पर्यटन स्थळ वापरात न येता ते अमलीपदार्थ अड्डा आणी अनैतिक प्रकार करण्याचे ठिकाण  बनले असून गोवाच्या कानाकोपऱ्यातील अमली पदार्थ सेवन विक्री करणारी टोळकी, प्रेमाचे चाळे करणारे आणी आंबट शौकीन अश्या लोकांची माडेल भागात दिवस भर आणी खास करून संद्याकाळी वर्दळ ज्यास्त होऊ लागली. जलसंपदा खाते, सांगे पोलीस यांचे नियंत्रण नसल्याने संचार बंदी काळातही. माडेल भागात संचार वाढतच असल्याचा तक्रारी उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांच्या कानी पडताच त्यांनी जलसंपदा खात्याच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन माडेल भागात प्रवेश करणाऱ्या मुख्य फाटकाला टाळे ठोकले. 

        माडेल साळावली भाग हा चांगले  पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला न येता अनैतिक प्रकार करण्याचे ठिकाण म्हणून अधिक नावलौकिक मिळविले आहे. एका बाजूने जंगल दुसऱ्या बाजूने जलाशय व मध्ये जलसंपदा खात्याने करोडो रुपये खर्चून कृत्रिम बेट तयार केले आहे. अर्धवट काम करून खात्याने ओसाडरित्या हा परिसर सोडून दिला. सौरऊर्जा दिवाबत्तीची तोडफोड करण्यात आली, आतील भागात सर्वत्र झाडी झुडपे  वाढलेली आहे, पोलीस  नाही, सुरक्षा रक्षक नाही, जवळपास गाव लोकवस्ती नाही अश्या निरव ठिकाणी फक्त अनैतिक धंदे चाललेले असतात. 

     जलाशय  भरलेला असो किंवा नसो या भागात गर्दी कायम असते. विरंगुळा म्हणून कोणी जाण्याचे सहजा धाडस कोणी करूं नये. झिंग चढलेली असल्यास  नाहक आफत ओढून घेण्यासारखं आहे. सोबतीला दारू, बियर च्या बाटल्या, सिगारेट, गुटखा, अमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार  वाढलेल्या झुडपांच्या आडोशाला अधिक होऊ लागलें आहे. कोणाचेच नियंत्रण नसल्याने सर्रास पणे असले धंदे चालले जात आहे. लांबलचक जागा असल्याने कोण कुठल्या झुडपात दडलेला असेल हे सांगता येत नाही. कित्तेक टोळकी वाढदिवस साजरा करण्यासाठी खास केक घेऊन या ठिकाणी येत असल्याचे त्या ठिकाणी पडलेल्या केकबॉक्स वरून दिसून येथे. बियर कॅनबरोबर दारूच्या फोडलेल्या बाटल्या जागोजागी पाहायला मिळत आहेत. 

 उघड्या फाटकातून दुचाक्या आडोशाला पार्क केल्या जात आहे. संचार बंदी असल्याने सात च्या आत घरात असा आदेश राज्यभर असताना उत्तर आणी दक्षिण गोव्यातील तरुण युगले अंधार होत आला तरी निर्जन ठिकाणी बसण्याचे धाडस करीत आहे. काहीजण रात्रौच्या वेळी ओल्यापार्ट्या करीत असतात. एकूणच माडेल भाग अल्पकाळात अनैतिक व्यवहाराचे ठिकाण म्हणून यात समाविष्ट होणाऱ्या लोकांमुळे प्रसिद्ध झाले आहे. माडेल भागात उपजिल्हाधिकारी अजय गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर यांनी स्वतः पहाणी करून या भागातील प्रकार पहिले. तिथे असलेल्याना दमदाटी देऊन परत या भागात फिरणार नाही या शब्दावर हाकलून लावले. 

      हा सर्व प्रकार पाहून उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी जलसंपदा पजिमळ सांगे येथील कार्यालयातील अभियंत्यांना बरोबर घेऊन सताड उघडा असलेल्या फाटकाला अखेर टाळे ठोकण्यात आले व या नंतर माडेल भागात कोणी दिसल्यास कारवाई करण्याचे संकेत उपजिल्हाधिकाऱ्यानी दिले आहे.

संबंधित बातम्या