सासष्टी जमीन बळकाव प्रकरण तब्बल एका वर्षानंतर एसआयटीकडे

17 जणांवर गुन्हा नोंद : सरकारी अधिकाऱ्यांचा हात असण्याचीही शक्यता
सासष्टी जमीन बळकाव प्रकरण तब्बल एका वर्षानंतर एसआयटीकडे
Land Scam In GoaDainik Gomantak

मडगाव: मूळ जमीन मालकांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्तांचे म्युटेशन करून त्या परस्पर विकण्याची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर सासष्टीतील 17 जणांवर हेरफेरीचा गुन्हा फातोर्डा पोलीस स्थानकात नोंद केला होता. हा गुन्हा नोंदवून आता एक वर्ष उलटल्यावर हे प्रकरण आता एसआयटीच्या ताब्यात दिले जाणार आहे.

(Salcete land grabbing case to SIT after one year)

Land Scam In Goa
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले?

कुंकळ्ळी, कुडतरी, राय, दवर्ली, धर्मापूर, सां जुझे द आरियाल, उतोर्डा व गिर्दोळी येथील जमनी बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून विकल्याचे स्पष्ट झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात मूळ मालकांनी तक्रारी केल्यानंतर सासष्टीचे तत्कालीन मामलेदार प्रताप गावकर यांनी या प्रकरणी फातोर्डा पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी जरी 17 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असला तरी त्यापैकी दोन संशयितांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून अन्य तीन संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रथमदर्शनी तपासात या घोटाळ्यात काही सरकारी अधिकारीही सामील असल्याची पोलिसांना शंका आहे.

Land Scam In Goa
विधवा प्रथेविरोधात ग्रामीण गोवा सरसावला

असे जरी असले तरी मागच्या वर्षभरात या प्रकरणाचा तपास फारसा पुढे गेल्याचे दिसून येत नाही. आतापर्यंत या प्रकरणात केवळ एकाच संशयिताची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून अन्य संशयितांनी त्याना पोलीस स्थानकात हजर राहण्याच्या नोटीसा जारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणेच पसंत केले असून त्यांच्यावर पोलिसांनीही काही कारवाई केलेली नाही.

यासंबंधी फातोर्डा पोलीस स्थानकावर चौकशी केली असता हे प्रकरण आता एसआयटीकडे देण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक गिरेन्द्र नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com