एसजीपीडीए मार्केटबाहेर खुलेआम मासळी विक्री, पालिकेचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

एसजिपिडिए घाऊक मासळी मार्केटच्या बाहेर कंदब बस स्थानक रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात किरकोळ मासळी विक्री खुले आम सुरु असुन पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.

नावेली: एसजिपिडिए घाऊक मासळी मार्केटच्या बाहेर कंदब बस स्थानक रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात किरकोळ मासळी विक्री खुले आम सुरु असुन पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.

यापुर्वी या मार्केट मध्ये काही किरकोळ मासळी विक्रेत्या मासळी विक्री करत असल्याने एसजीपीडीए किरकोळ मासळी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष फेलिक्स गोन्साल्वीस यांनी आक्षेप घेऊन एसजीपीडिए घाऊक मासळी विक्री बंद करण्याची मागणी केली होती.

त्या नंतर घाऊक मासळी मार्केटमधे करण्यात येणारी मासळी विक्री बंद करण्यात आली होती आता पुन्हा एकदा किरकोळ मासळी विक्रेत्यांनी आपला मोर्चा घाऊक मासळी मार्केटच्या बाहेर संपूर्ण रस्त्याच्या बाजूला गाडी पार्कींग करण्याच्या जागेत सुरु केल्याने मार्केटमध्ये मासळी खरेदी करण्यासाठी येणार्या ग्राहकांना पार्कींगसाठी जागा मिळणे कठीण बनले आहे. माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांना विचारले असता त्यांनी मार्केटच्या बाहेर किरकोळ मासळी विक्री करणे चुकीचे असल्याचे सांगितले.
 

संबंधित बातम्या