Goa Updates: जमीन विक्रीसाठी विणले रस्त्यांचे जाळे

नियमांची पायमल्ली: वाघेरी डोंगराच्या पायथ्याशी जंगलाचा विद्ध्वंस सुरू
Goa Updates: जमीन विक्रीसाठी विणले रस्त्यांचे जाळे
Sale of land and Road work has startedDainik Gomantak

पणजी: काही महिन्यांपूर्वी वाघेरी डोंगराच्या माथ्यावर जंगलाचा विद्ध्वंस करून रस्त्याचे जाळे विणल्याचे वृत्त दैनिक ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात हे काम बंद राहिले होते. मात्र, आता वाघेरीच्या पायथ्याशी रस्ताकामाला सुरवात केली आहे. त्यासाठी जेसीबी यंत्र मशीन पायथ्याशी मोठी जंगलतोड सुरू आहे. वाघेरी डोंगराची मोठ्या प्रमाणात विक्री केली असून डोंगराच्या बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे जाळे विणण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हे रस्ते करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी केली आहे. तसेच रस्ता करण्यासाठी दगड (जांबे) टाकले आहे.

Sale of land and Road work has started
सोमवारपासून गोवा डेअरीचे दूध महागणार

1997 मध्ये वाघेरीवरील सर्वे क्र.102 याचा समावेश खाजगी जंगल क्षेत्रात करण्यात आला होता. याठिकाणीच्या वनक्षेत्राचा ऱ्हास करून प्रकल्प हाती घेता येत नाही. त्याचप्रमाणे हे जंगल क्षेत्र केंद्रीय वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने म्हादई अभयारण्यसाठी जे पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्र म्हणून अधिसूचित केलेले आहे त्यात येत आहे. पट्टेरी वाघ, अस्वल, भुजंग अशा प्राण्याचे वास्तव येथे आहे. हल्लीच पायथ्याशी वसलेल्या झर्मे गावात दोन भुजंग पकडण्यात आले आहे. पर्यावरणीय पर्यटन नावाखाली येथे प्रकल्प उभारण्यात आले तर त्याचे मोठे दुष्परिणाम सत्तरीला भोगावे लागतील. केरी येथील धरणाचे पाणी धारण करण्याची क्षमता गाळ साचल्याने यापूर्वीच कमी झालेली आहे. त्यात आणखी भर पडून हे धरण आगामी काळात निकामी ठरण्याचा भय व्यक्त केला जात आहे.

Sale of land and Road work has started
गोवा खंडपीठाच्या सहा पंचायतींना नोटिसा...

बेकायदा रस्त्याची कामे

केरी गावसवाडा येथून या डोंगराची सुरुवात होते. गावसवाड्यावरून काही अंतरावर गेल्यावर डोंगरावर जाण्यासाठी येथे चार विविध दिशेने हे रस्ते बनवले जात आहेत. अशा प्रकारचे रस्ते बनवण्यासाठी स्थानिक पंचायत व नगर नियोजन खात्याची परवानगी हवी असते. पण संबंधितांनी परवानगी घेतलेली नाही.

परप्रांतीयांना विकल्या जमिनी

वाघेरीवरील सर्व्हे क्रमांक 102/1 येथे गत वर्षी एकूण 7 जणांना जमिनीची विक्री केली. आता सर्व्हे क्रमांक 102 मध्ये पाच कच्च्या झोपड्यांना केरी ग्रामपंचायतीने अस्तित्वात असलेले घर क्रमांक बहाल केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.