Land Grabbing Case Goa: दवर्ली जमीन हडप प्रकरणातील फरार संशयीत सलीम दोडामणी याला अटक

वकिलाला भेटण्यासाठी जाण्याच्या तयारीत असताना वाटेतच जेरबंद
Land Grabbing Case
Land Grabbing CaseDainik Gomantak

Land Grabbing Case in Goa: दवर्ली जमीन हडप प्रकरणातील फरार असलेला सूत्रधार सलीम दोडामणी याला आज मडगाव पोलीसांनी फातोर्डा येथे अटक केली.

उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याच्या उद्देशाने संशयीत आपल्या वकिलाला भेटण्यासाठी पणजीला जाण्याच्या तयारीत असताना त्याचा मागावर असलेल्या पोलीसांनी त्याला वाटेतच जेरबंद केले.

या प्रकरणातील अन्य एक संशयीत राजदीप कुंडईकर याने सध्या अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोन्ही संशयितांनी यापूर्वी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी फेटाळून लावला होता.

Land Grabbing Case
Shooting At Vasco : अखेर सुगावा लागला; झुआरीनगर दरोड्याचा प्रयत्न, पोलिसांवर गोळीबार प्रकरणी दिल्लीतून एकाला अटक

मडगाव येथील वयोवृध्द व्यापारी सालेह महमद मुसा यांच्या मालकीचे दोन प्लॉट संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार करुन परस्पर विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

यासाठी एका मृत पावलेल्या नोटरीच्या नावे बनावट शिक्के तयार करून मुखत्यार पत्र तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मडगावचे पोलीस उप अधीक्षक संतोष देसाई आणि निरिक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक समीर गावकर आणि उप निरिक्षक विश्वजीत ढवळीकर यांनी ही कारवाई केली.

त्यांना सहाय्यक उप निरीक्षक दिलखुष वेळीप, हवालदार समीर नागुरी, गोरखनाथ गावस, शेखर सावंत आणि पोलीस शिपाई सुबानी शेख यांचे सहकार्य लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com