आमोणे पंचायतीच्या सालिया गावस सरपंच

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

सालिया गावस यांचा सरपंचपदी निवड करण्यात आली.  सरपंचपदी सालीया गावस यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. सूचक संदेश नाईक व अनुमोदक म्हणून सांघवी फडते यांची अर्जांवर स्वाक्षरी केली.

आमोणे: येथील विद्यमान सरपंच काशिनाथ म्हातो यांचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्याने येथील सरपंचपद रिकामे झाले होते. आज झालेल्या

सालिया गावस यांचा सरपंचपदी निवड करण्यात आली.  सरपंचपदी सालीया गावस यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. सूचक संदेश नाईक व अनुमोदक म्हणून सांघवी फडते यांची अर्जांवर स्वाक्षरी केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी ठराविक वेळेवर अर्जाची छाननी केल्यावर नियमाप्रमाणे निवडणूक अधिकारी नवनाथ आम्रे यांनी सालीया सदानंद गावस हिची सरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

मोणे पंचायत सभागृहात सदर निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून तेथील नवनाथ आम्रे व पंचायत सचिव सुरेश फडते उपस्थित होते. पंचसदस्य संदेश नाईक, बिजेश सावंत, सांघवी फडते, शांबा गावस  व सालिया गावस उपस्थित होते.या निवडणूकीत पंच म्हातो यांच्या मातोश्रीचे निधन झाल्यामुळे ते अनुपस्थित राहिले तर पंच कृष्णा गावस उपस्थित नव्हते.

सरपंच सालीया फडते यांच्या निवडीचे पंच संदेश नाईक यांनी अभिनंदन केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या