गंडा घालण्‍यात पटाईत असलेला अट्टल संशयित जेरबंद

2019 मध्ये गैरव्यवहार व फसवणूक करून लाखोंना गंडा घालणारा फरार संशयित सलमान शेख याला अखेर अटक करण्यात मडगाव पोलिसांना यश आले आहे.
गंडा घालण्‍यात पटाईत असलेला अट्टल संशयित जेरबंद
ArrestedDainik Gomantak

2019 मध्ये गैरव्यवहार व फसवणूक (Cheating) करून लाखोंना गंडा घालणारा फरार संशयित सलमान शेख (46, बाणावली) याला अखेर अटक (Arrested) करण्यात मडगाव पोलिसांना यश आले आहे. वाहन पळविण्यासह आर्थिक फसवणूक करून तब्बल दोन वर्षांपासून हा संशयित फरार होता. या प्रकरणातील दुसरा संशयित रवी यादव (46, ठाणे) अजूनही फरार आहे.

मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर 2019 रोजी ही घटना घडली होती. संजय फटजी (42, सडा वास्को) या प्रकरणी तक्रारदार आहेत. संशयित रवी यादव हा सलमान यांच्याकडे कामाला होता. संशयित सलमान याने तक्रारदाराचा विश्वास जिंकून घेतला आणि वाहतूक व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांची चारचाकी आपल्याला देण्याची मागणी केली.

Arrested
अखेर वागातोरवासीयांचा पाणीपुरवठा दिलायरा लोबो यांच्या प्रयत्नाने सुरळीत!

संशयिताने ठरलेल्या अटीनुसार वाहन घेतल्यावर त्याने दरमहा त्याला 25 हजारही दिले. असे करून त्यांनी सुमारे 1 लाख 60 हजार रुपये त्याला दिले आणि अन्य 3 लाख रुपये देणे बाकी असताना संशयित रवी यादव हा अचानक चारचाकी घेऊन फरार झाला. या प्रकरणी सलमानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तोही फरार झाल्याचे कळाल्यावर पोलिसात तक्रार नोंद करण्यात आली.

अन्‍य राज्‍यांत घेत होता आश्रय

गंडा घालणारा संशयित मडगाव पोलिसांना हवा होता. पोलिसांपासून लपण्याच्या प्रयत्नात वारंवार आश्रयासाठी अन्य राज्यात तो पळ काढत होता. गुरुवारी सलमान हा बाणावली येथे आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्वरित कारवाई करून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्याच्यावर भादंसंच्या 406, 420 कलमांखाली गुन्हा नोंद केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक जितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर धाटकर, दिलखुश वेळीप, हेड कॉन्स्टेबल शमीर, गोरखनाथ गवस, कल्पेश खोलकर, विशाल प्रभू, वसीम शेख व शुभानी शेख यांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com