'Samagam' program in Shirsai by Tapobhumi Sant Samaj
'Samagam' program in Shirsai by Tapobhumi Sant SamajDainik Gomantak

तपोभूमी संत समाजातर्फे शिरसईत 'समागम' कार्यक्रम

श्री दत्त पद्मनाभ पीठ, क्षेत्र तपोभूमी संचलीत संत समाज शिरसईतर्फे विशेष संत समागम शनिवारी (ता.2) पार पडला.

डिचोली : श्री दत्त पद्मनाभ पीठ, क्षेत्र तपोभूमी संचलीत संत समाज शिरसईतर्फे विशेष संत समागम शनिवारी (ता.2) पार पडला. कै.पुंडलीक आमोणकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजन करण्यात आलेल्या संत समागमाची सुरवात कु. ऋत्विक पुंडलीक आमोणकर यांच्या यजमान पदाखाली तसेच श्रीकांत आमोणकर यांच्या पौरोहित्या खाली सद्गुरुपूजनाने झाली.

'Samagam' program in Shirsai by Tapobhumi Sant Samaj
'सिंगल यूज' प्लास्टिक आरोग्यासाठी धोकादायक?

व्यासपिठावरील उद्घाटक उदय नाईक व धर्म प्रचारक शशीभाऊ केरकर आणि सर्वांच्या उपस्थितीत प्रार्थना, शांतीपाठ, गिता पाठ म्हणण्यात आला. धर्मप्रचारक शशीभाऊ केरकरतर्फे निरूपण सेवा संपन्न झाली. या संत समागमाला संत समाज, डिचोली, वास्को, होंडा, ओपा खांडेपार,शिरोडा, फोंडा, पर्वरी, मयडे, डिचोली, पेडे-म्हपसा, रेवोडा,थिवी-माडेल व शिरसई या सर्व संतसमाजातील गुरूबधू-भगिनी उपस्थित होते.

संत समागमाला उपस्थित गुरूबंधू-भगिनींचे बटू विष्णू पुंडलीक आमोणकर यांनी आभार मानले. शेवटी आरती आणि पसायदानाने विशेष संत समागमाची सांगता झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com