नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदिप लावू जगी; देवारी कुटुंबियांची ४२ वर्षांची परंपरा कायम

Samaj Prabodhan through Kirtan
Samaj Prabodhan through Kirtan

बोरी: कीर्तनकारांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे महान कार्य केलेले आहे. बोरीतील स्व. विनायक ऊर्फ शशिकांत देवारी यांनी दरवर्षी राज्यातील विविध गावातील मंदिरात नवरात्रोत्सवात महाराष्ट्र कर्नाटक व अन्य राज्यातून कीर्तन सेवेस येणाऱ्या कीर्तनकार आणि साथी कलाकारांना एकत्रित करण्यासाठी कीर्तनकार संमेलने सुरू केली व गेली ४२ वर्षे ही कीर्तन संमेलनाची परंपरा अखंडपणे चालू ठेवली त्याबद्दल देवारी कुटुंबीय अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी केले.


देऊळवाडा बोरी येथील मिलिंद देवारी यांच्या निवासस्थानी आज मंगळवार २० रोजी आयोजित केलेल्या ४२ व्या कीर्तनकार संमेलनाच्या उद्‌घाटन प्रसंगी वंसकर बोलत होते.


गोमंतकीय भजन गायक सुरेंद्र बोरकर, मिलिंद देवारी, दत्तात्रय ऊर्फ बाबू देवारी, महेश धामस्कर,  विश्वंभर देवारी, दिलीप धामस्कर, उदय नाईक, दिलीप उर्फ दीपा च्यारी, मेघना देवारी आदी मान्यवर उपस्थित होते.


वंसकर म्हणाले, या वर्षी कोरोना सावटामुळे बहुतेक मंदिरात नवरात्रौत्सव निमित्तची कीर्तने बंद ठेवली गेल्याने कीर्तनकार येऊ शकले नाहीत. अन्यथा देवारींच्या या निवासस्थानाला मोठमोठ्या कीर्तनकाराचे पाय लागायचे व कीर्तनकाराना बहुमान व्हायचा ही परंपरा अशीच चालू ठेवल्याबद्दल त्यांनी देवारी बंधूचे अभिनंदन केले. वंसकर यांच्या हस्ते ज्येष्ठ गोमंतकीय भजनी कलाकार सुरेंद्र बोरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. सुरेंद्र बोरकर यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून कीर्तनकार संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच देवर्षी नारदमुनींच्या तसबिरीला पुष्पहार घालण्यात आला. बोरकर यांचे सत्काराला उत्तर देणारे भाषण झाले. स्व. विनायक देवारी यांनी सुरू केलेला हा कीर्तनकार संमेलनाचा यज्ञ त्यांच्या मुलांनी चालू ठेवल्याबद्दल बोरकर यांनी समाधान व्यक्त केले. 


याप्रसंगी अलीकडेच दिवंगत झालेले कीर्तनकार गणेशवाडी येथील नारायणबुवा काणे, भागवतकार वा. ना. उत्पात (पंढरपूर), नांदेड येथील शरद महाराज नेरळकर, गोमंतकीय मराठी साहित्यिक देवीदास देवारी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी मंगलाचरण, सरस्वती वंदना, आणि गोंधळ धनश्री देवारी, मृदुला देवारी, आरुषी चाफाडकर, मेघना देवारी आणि सौ. आरती चाफाडकर यांनी सादर केला. प्रथमेश देवारी यांनी एकलवादन केले. मृदुला देवारी रे गणराया हे भक्तिगीत म्हटले. तर सुरेंद्र बोरकर, दत्तात्रय देवारी, उदय नाईक, दिगंबर देवारी, दीपा च्यारी, मिलिंद देवारी, महेश धामस्कर यांनी भजन सादर केले. मेघना देवारी यांनी स्वागत केले. तर मिलिंद देवारी यांनी आभार मानले. वंदना कोरडे, आशय कोरडे, दिगंबर देवारी आदींनी व्यवस्थापनाची बाजू सांभाळली. या कीर्तन संमेलनात बरेच नागरिक सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com