वास्को गोवा, संपर्क क्रांती एक्‍सप्रेसच्या वेळेत बदल

अवित बगळे
रविवार, 19 जुलै 2020

दोन्ही गाड्या दहा मिनीटे लवकर येणार
 

पणजी

लॉकडाऊन नंतर रेल्वे प्रशासनाकडून सुरू केलेल्या दोन विशेष लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या नियोजित वेळेत बदल करण्यात आला आहे. गोवा एक्‍सप्रेस आणि संपर्क क्रांती एक्‍सप्रेस या दोन्ही गाड्या नव्या वेळे नुसार दहा मिनीटे आधी मिरज स्थानकात दाखल होतील आणि पुन्हा दहा मिनीटे लवकर रवाना होतील. नवे जुने वेळापत्रक असे 10 ः 25 मिनीटां ऐवजी 10 ः 15 मिनीटांनी मिरजेत दाखल होईल. तर 10 ः 30 मिनीटांनी सुटणारी गाडी 10 ः 20 मिनीटांनी ण्य्‌ुाकडे रवाना होईल. निजामुद्दीन दिल्ली येथून 10 ः 20 मिनीटां एवजी 10 ः 10 मिनीटांनी मिरजेत दाखल होईल. तसेच सांगली स्थाकात देखिल या गाड्या नियोजित नव्या वेळेनुसार 10 ः 42 मिनीटां ऐवजी 10 ः 32 मिनीटांनी सांगलीत दाखल होईल. तर 10 ः 45 मिनीटां एवजी 10 ः 32 मिनीटांनी ण्य्‌ुाकडे रवाना होईल. निजामुद्दीन दिल्ली येथून येणारी गाडी 9 ः 27 मिनीटां एवजी 8 ः 57 मिनीटांनी सांगलीत दाखल होईल. निजामुद्दीन दिल्ली येथून येणारी 9 ः 30 मिनीटां एवजी 9 वाजता सांगली स्थानकात दाखल होईल. तर यंशवंतपूर येथून येणारी यशवंतपूर संपर्क क्रांती ऐक्‍सप्रेस पहाटे 3 ः 15 एवेजी 3 ः 5 मिनीटांनी मिरजेत दाखल होईल. तर 3 ः 20 एवजी 3 ः 10 मिनिटांनी निजामुद्दीकडे रवाना होईल. तर निजामुद्दीन येथून येणारी निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती ऐक्‍सप्रेस दुपारी 4 ः 35 एवेजी 4 ः 25 मिनीटांनी मिरजेत दाखल होईल. तर 4 ः 40 एवजी 4 ः 30 मिनिटांनी यशवंतपुरकडे रवाना होईल.

संबंधित बातम्या