अश्लील व्हिडिओसंदर्भात तक्रारदार सम्राट भगत यांची न्यायालयात धाव

Samrat bhagat appeals in the district court against the bail granted to the accused
Samrat bhagat appeals in the district court against the bail granted to the accused

काणकोण: काणकोणात चापोली धरणावर काढलेल्या अश्लील व्हिडिओसंदर्भात तक्रारदार सम्राट भगत यांनी संशयितांना काणकोण प्रथम सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन जामिनाला हरकत घेणारा दावा सादर केला आहे. या दाव्यात भगत यांनी पोलिस, तसेच संशयीत पुनम पांडे व सॅम अहमद बॉम्बे यांना प्रतिवादी केले आहे.

या संदर्भात भगत यांच्या वकिलांनी पुनम पांडे व सॅम अहमद बॉम्बे यांच्याविरूध्द वेगवेगळ्या याचिका सादर करून प्रथम सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. ५ ऑक्टोबरला उत्तर गोव्यातून पूनम व सॅम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, लागलीच त्याच्या वकिलांनी काणकोण प्रथम सत्र न्यायालयात त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला.न्यायालयाने त्याच्या अर्जाची दखल घेत त्याना त्याच दिवशी काही अटींवर जामिन मंजूर केला. त्याच्यावतीने चार वकीलानी त्यांची बाजू मांडली मात्र पोलिसांत्रफे कोणीच वकील न्यायालयात बाजू मांडण्यासाठी उपस्थित नव्हता.दोघी संशयीत आरोपींना २० हजार रुपयांचा जामीन त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ पोलिस स्टेशनवर उपस्थित राहण्याची अट घालण्यात आली होती.


यापूर्वी बहुचर्चित मॉडेल पूनम पांड्ये व सॅम बॉम्बे यांना घेऊन चापोली धरणावर गेलेल्या रिक्शा चालकाने आपण ३१ ऑक्टोबरला धरण परिसरात गेल्याचे यावेळी उपअधीक्षक अल्बुकर्क यांना सांगितले होते. त्यावेळी साध्या वेशातील पोलिस ही त्यावेळी उपस्थित होते. या अश्लील व्हिडिओ संदर्भात पहिल्यांदा काणकोण पोलिसांत तक्रार केलेले सम्राट भगत यांनी हा व्हिडिओ सतरा मिनिटांचा असून सकाळी पोलिसाच्या संगनमताने त्याचे चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप केला होता.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com