सनातन धर्माची कोरोना, एड्सशी तुलना; गोवा हिंदू जनजागृती समिती आक्रमक, अमित शहांना पत्र लिहून केली मोठी मागणी

कारवाई न केल्यास देशभरात तीव्र आंदोलने करण्याचा समितीचा इशारा
Sanatan Dharma Row
Sanatan Dharma Row

Sanatan Dharma Row: सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना केल्याने त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. याप्रकरणी आता गोवा हिंदु जनजागृती समिती देखील आक्रमक झाली असून, त्यांनी स्टॅलिन, खर्गे आणि ए. राजा यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, अटक न केल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा करणारे तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे आणि तामिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

या सर्वांवर ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA)’ लावावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यांच्यावर कारवाई न केल्यास, देशभरात तीव्र आंदोलने करण्यात येतील, असा इशारा समितीने दिला आहे.

Sanatan Dharma Row
Goan Street Food Sameera Reddy Video: समीरा रेड्डी म्हणते गोव्यात आल्यावर 'हे' 5 स्ट्रीट फूड खावेच लागतायेत!

देशातील विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत झाल्यानंतर त्यातील सहभागी काही पक्षांकडून सनातन धर्माला लक्ष्य करण्याची चढाओढ लागली आहे. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेवर घाला घालून देशाची एकता, अखंडता आणि शांतता धोक्यात आणली जात आहे. तसेच मंत्री आणि खासदार या संवैधानिक पदावर असलेल्या विविध जबाबदार व्यक्तींकडून अशा प्रकारची वक्तव्ये होणे, हा एकप्रकारे लोकशाहीचा पराभव आहे. असे समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

'धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या नेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षा दिली नाही, तर देशातील शांतता, एकता आणि अखंडता धोक्यात येईल. तसेच देशात दंगली घडवून अराजक माजवण्याचा त्यांचा उद्देश सफल होईल. असे झाल्यास त्याला संपूर्णपणे पोलीस आणि प्रशासन उत्तरदायी असेल,' असेही समितीने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com