सुभाष फळदेसाईंची उपसभापती पदी निवड

निवडणुकीत 24 विरुद्ध 15 मतांनी फळदेसाई यांनी मिळवला विजय
सुभाष फळदेसाईंची उपसभापती पदी निवड
Sanguem MLA Subhash Faldesai has been elected as Deputy Speaker of the House polling 24 versus 15 votesDainik Gomantak

पणजी : गोवा विधानसभेच्या सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. यात भाजपच्या रमेश तवडकर यांची विधानसभा सभापतीपदी निवड झाली आहे. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या आलेक्स सिक्वेरा यांचा 24 विरुद्ध 15 मतांनी पराभव केला आहे. दरम्यान आज सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई (Subhash Phaldesai) यांची विधानसभेचे उपसभापती पदी निवड झाली आहे. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत 24 विरुद्ध 15 मतांनी फळदेसाई यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी सांगे (Sanguem) मतदारसंघातून यावेळी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

Sanguem MLA Subhash Faldesai has been elected as Deputy Speaker of the House polling 24 versus 15 votes
गोवेकरांच्या शिक्षणासाठी सरकारकडून 3850.98 कोटींची खास तरतूद

दरम्यान, सांगे मतदारसंघाला यावेळी तरी मंत्रिपद द्यावे अशी मागणी सांगे भाजपा मंडळाने केली होती. आठ मंत्र्यांची शपथविधी झाला असून यात सुभाष फळदेसाई यांचे नाव नसल्याने सांगे भाजपा मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. आता सुभाष फळदेसाईंची उपसभापती पदी निवड झाल्यामुळे सांगे भाजपा मंडळाची नाराजी दूर झाल्याचे दिसत आहे.

सांगे मतदारसंघ भाजपाचा (BJP) बालेकिल्ला असून पाच वेळा सांगेतून आमदार (MLA) निवडून दिला आहे पण अजूनपर्यंत मंत्रीपदापासून वंचित असल्याने यावेळी तरी मंत्रिपद मिळाले पाहिजे असे माजी आमदार (MLA) वासुदेव गावकर यांनी मत व्यक्त केले होते. सांगे मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या बराच मोठा असून अनुसूचित जमातीच्या लोकांचा अधिक भरणा असल्याने या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणे अत्यंत गरजेचे आहे व यासाठी सांगेला मंत्रिपदाची आवश्यकता आहे असे गावकर यांनी सांगितले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com