Sanguem School : शिक्षेमुळे विद्यार्थ्यावर ऑक्सिजनद्वारे उपचारांची वेळ; सांगेतील प्रकार

शिक्षकाचा प्रताप; उन्हात फेऱ्या मारल्याने अनेकांना भोवळ
Sanguem school
Sanguem schoolDainik Gomantak

Sanguem School : येथील मिरॅकल्स हायस्कूलमध्ये आज धक्कादायक प्रकार घडला. सातवीचे विद्यार्थी गोंगाट करत असल्याने एका शिक्षकाने भर उन्हात त्यांना 265 फेऱ्या मारण्याची शिक्षा सुनाविली.

यावेळी अनेक विद्यार्थी भोवळ येऊन पडले. काहींना उलट्या झाल्या. तर एकाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला सांगे आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले.

तिथे त्याच्यावर ऑक्सिजनद्वारे उपचार करण्यात आले. याबाबत संतप्त पालकांनी संबंधित शिक्षकाविरोधात मुख्याध्यापक तसेच सांगे पोलिसांत तक्रार दिली आहे.

Sanguem school
MLA Disqualification Petition : सुनावणीसाठी वेळेचे बंधन नाही म्‍हणून ती प्रलंबित ठेवणार का?

शिक्षेचा असा घटनाक्रम

शाळेतील सातवीचे विद्यार्थी सकाळी दहानंतर असणाऱ्या तिसऱ्या तासाला गडबड करू लागले. यामुळे कॅगन गोम्स या शिक्षकाने सातवीच्या 45 विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून भर उन्हात 265 फेऱ्या मारण्याची शिक्षा सुनावली.

कोणीही थांबल्यास नजर ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांची नेमणूक केली. उन्हात मुले पाऊण तास ही शिक्षा भोगत असताना अनेकजण भोवळ येऊन पडू लागले. यावेळी फ्रेनवील फर्नांडिस याला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

Sanguem school
कट्टर राष्‍ट्रवादाचे ओंगळवाणे प्रदर्शन; अल्पसंख्याकांना दमदाटी

मुले शाळेला उशीर होईल, म्हणून टिफिन घेऊन जातात. त्यात टिफिन खाण्याआधीच असली शिक्षा देणे म्हणजे लहान मुलांवर केलेला अत्याचार आहे. पालकांना उर्मट उत्तरे देणाऱ्या शिक्षकाला योग्य शिक्षा व्हायलाच हवी.

- मिल्टन फर्नांडिस, पालक

या प्रकाराबद्दल माहिती नाही. तसे घडले असेल तर ही गंभीर बाब आहे. यासंदर्भातची तक्रार विद्यार्थ्यांच्या पालकांकडून किंवा पालक-शिक्षक समितीकडून आलेली नाही. मात्र, तक्रार आल्यास त्याची चौकशी केली जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल.

- शैलेश झिंगडे, शिक्षण संचालक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com