'गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हैदोस'; सावंत सरकारवर राऊतांचा घणाघात

शिवसेनेनं (Shiv Sena) आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली.
'गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हैदोस'; सावंत सरकारवर राऊतांचा घणाघात
Sanjay RautDainik Gomantak

आगामी गोवा विधानसभा निवडणूकीच्या (Goa Assembly Elections) तयारीसाठी सर्वच राजकिय पक्ष गोव्यात उतरत आहेत. तसेच त्या त्या पक्षांचे प्रमुख नेतेही गोव्यामध्ये येत प्रमोद सावंत सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यातच आज शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत (Sanjay Raut) गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांना दरम्यान गोव्यात शिवसेनेची (Shiv Sena) ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. 'आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 22 जागा लढवणार आहोत. गोव्याचे सरकार रोज नवीन थापा मारत आहे. गोव्यात ड्रग्स आणि कॅसिनोचा हौदोस घातला आहे. कॅसिनोच्या विरुद्ध प्रचार करून भाजप (Bjp) सत्तेवर आला. आता ते त्यांचं समर्थन करत आहेत,' अशी टीकाही राऊतांनी केली. शिवसेना खासदार हे आजपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात 22 जागांवर लढणार असल्याचं मत वक्तव्यावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते दाबोळी विमानतळावर (Daboli Airport) पत्रकारांशी बोलत होते.

Sanjay Raut
Goa Election: संजय राऊत आज गोव्यात, शिवसेना 22 जागा लढवणार

शिवसेना प्रभारी आणी राज्यसभेतील खासदार श्री संजय राऊत यांचे गोवा दाबोळी विमानतळावर आगमन झाले. बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3.30 वाजता गोवा विमानतळावर आगमन झाले.यावेळीत्यांच्या स्वागतार्ह गोवा शिवसेना प्रमुख मा.श्री जितेश कामत व उपप्रमुख मा श्री सुभाष केरकर, सरचिटणीस मा श्री मिलिंद गावस आणि कुठ्ठाळी मतदार संघातील महिला आघाडीच्या व शिवसेना प्रमुख सौ.भक्ती खडपकर, रीया पाटील उपस्थित होत्या.

Sanjay Raut
Breaking News: शिवसेना प्रभारी संजय राऊत गोव्यात दाखल

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, गोव्यात पक्ष फोडले जातात आणि सत्ता हस्तगत केली जाते. महाराट्रात आम्ही पक्ष फोडले नाहीत तर आम्ही तीन पक्ष एकत्र आलो, अस राऊत यांनी सांगताना गोवा आणि महाराष्ट्राचं एक भावनिक नातं आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शिवसेनेने राज्यकारभार केला आहे त्याच पद्धतीने गोव्यात ही राज्यकारभार करणार असून गोव्यात शिवसेना २२ जागा लढविणार असून कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याची सध्याची गरज नाही. आमचा पक्ष संघटन मजबूत आहे आणि त्या जोरावर आम्ही त्या जागा जिंकू असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेवटी व्यक्त केले.

Sanjay Raut
गोव्यासह उत्तर प्रदेशच्या रणांगणातही शिवसेना लढणार,संजय राऊत यांनी केले स्पष्ट

राज्यात 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आता शिवसेनाही कंबर कसत आहे. निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेना खासदार तथा गोवा संपर्क नेते संजय राऊत 29 व 30 सप्टेंबर रोजी गोव्यात आहेत.राऊत यांच्या दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावेळी काही आजी-माजी सरपंच, पंच, राजकीय नेते तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे काहीजण शिवसेने प्रवेश करतील, तसेच पेडणे व मांद्रे येथील शिवसेना कार्यालयांचेही उद्घाटन केले जाणार आहे.

राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते राज्यातील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन येथील एकूण राजकीय स्थितीचा आढावा घेतील. यावेळी निवडणुकीत किती जागा लढवणार, इच्छुक उमेदवारांच्या कामाची पडताळणी होईल असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com