गोव्यातही शिवसेनेचा होणार आमदार; संजय राऊत असंतुष्ट नेत्यांना भेटणार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

संसदिय अधिवेशनानंतर श्री. राऊत हे गोव्यात येणार असून, ते असंतुष्ट नेत्यांशी चर्चा करुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखणार आहेत. असे शिवसेनेचे राज्य सरचिटणीस तथा प्रवक्‍ते मिलींद गावस यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

डिचोली: माननीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात शिवसेनेचा आमदार निवडून आणण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे. महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकवण्यात महत्वाची भूमिका बजावलेले शिवसेनेचे खासदार तथा गोवा संपर्क प्रमुख संजय राऊत यांनी तसे स्पष्ट संकेत देतानाच, राज्यातील भाजप आणि विरोधी पक्षातील काही असंतुष्ट नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे.

संसदिय अधिवेशनानंतर श्री. राऊत हे गोव्यात येणार असून, ते असंतुष्ट नेत्यांशी चर्चा करुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखणार आहेत. असे शिवसेनेचे राज्य सरचिटणीस तथा प्रवक्‍ते मिलींद गावस यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

शिवसेनेचे राज्य प्रमुख जितेश कामत यांच्यासह मिलींद गावस यांनी मुंबई येथे दै. ''सामना'' कार्यालयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेवून गोव्यातील शिवसेनेच्या कार्याबद्‌दल तसेच राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. कोरोना महामारी संसर्गाचा गोव्यातही फैलाव वाढत असल्याबद्‌दल संजय राऊत यांनी चिंता व्यक्‍त केली आहे, असे श्री. गावस यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या