उत्पल पर्रीकरांविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला, पण... : संजय राऊत

पणजीतून शिवसेनेने शैलेंद्र वेलिंगकर यांना दिलेल्या उमेदवारीवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

Sanjay Raut on Utpal Parrikar
Sanjay Raut on Utpal ParrikarDainik Gomantak

पणजी : उत्पल पर्रीकरांना पणजीतून निवडणूक लढवण्यास पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनेच पणजीत आपला उमेदवार दिला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्पल पर्रीकरांना पणजीतून निवडणूक लढवण्यास पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. उत्पल पर्रीकर हे पणजीतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र भाजपने त्यांना डावलत विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना तिकीट दिलं आहे. (Sanjay Raut on Utpal Parrikar News Updates)


Sanjay Raut on Utpal Parrikar
भाजप कोणत्याही परिस्थितीत गोव्यात सत्तेत येत नाही, लिहून घ्या : राऊत

शिवसेनेने (Shivsena) आज गोवा विधानसभेसाठी आपली 8 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्पल पर्रीकर इच्छुक असलेल्या पणजी मतदारसंघातूनही शिवसेनेने उमेदवार दिला आहे. पणजीतून शिवसेनेच्या तिकीटावर शैलेंद्र वेलिंगकर हे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पत्रकारांनी राऊतांना कोंडीत पकडलं. मात्र खासदार संजय राऊतांनी पणजीतील शिवसेना उमेदवाराबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


Sanjay Raut on Utpal Parrikar
सावित्री कवळेकरांनी उभारला सांगेत बंडाचा झेंडा!

उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) भाजपने तिकीट नाकारलं आहे. मात्र उत्पल पर्रीकर यांनी जर अपक्ष अर्ज भरला आणि शेवटपर्यंत उमेदवारीवर ठाम राहिले तर सेना आपला उमेदवार मागे घेईल, अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. शैलेंद्र वेलिंगकर हे आपला अर्ज मागे घेतील, तसं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी याबाबत चर्चा झाली असून आता उत्पल यांनी निर्णय घेतल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com