गोव्यात सेनेचेही एकला चलो रे !

यातच महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तेत असणारा शिवसेना गोव्यात विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून आपले भाग्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहे.
गोव्यात सेनेचेही एकला चलो रे !
Sanjay RautDainik Gomantak

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पाश्वभूमीवर सर्वच राजकिय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पाश्वभूमीवर राजकिय पक्षांनी प्रचार करण्यासाठी आणि सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. यातच महाराष्ट्रात सत्तेत असणारा शिवसेना गोव्यात विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून आपले भाग्य आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पणजीमध्ये (Panajim) पत्रकार परिषद घेत आपला पक्ष विधानसभा निवडणुकीमध्ये किती जागा निवडणार, राजकिय रणनिती काय असणार हे स्पष्ट केले आहे.

Sanjay Raut
Breaking News: शिवसेना प्रभारी संजय राऊत गोव्यात दाखल

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पणजीतील पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • 25 जागा स्वबळावर लढणार

  • गोव्यातील राजकारण्यांना रोग लागला असून सत्तेसाठी व मंत्रिपदासाठी उड्या मारत आहेत.

  • गोव्यात जनतेला जे हवे ते निर्णय घेतील.

  • गोव्यात सुशासन देण्याची शिवसेनेची भूमिका आहे.

  • गोव्याचे राजकारण निर्लज्ज पातळीवर गेले आहे.

  • यावेळी शिवसेना कोणत्याच प्रकारे युती आणि आघाडी न करता स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.

  • पर्रीकर यांच्या नंतर गोव्यातील स्थिती चांगली नसून नेतृत्वहीन स्थिती.

Related Stories

No stories found.