गोव्याचा नावलौकिक पुन्हा मिळवून देवू: संजय राऊत
Sanjay RautDainik Gomantak

गोव्याचा नावलौकिक पुन्हा मिळवून देवू: संजय राऊत

मराठवाडा मांद्रे येथे शिवसेना (Shiv Sena) कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

बेरोजगारांना रोजगार, ढासळत चाललेली कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून शांती आणि सलोख्यासाठी प्रसिद्ध असलेला गोव्याचा (Goa) नाव लौकिक पुन्हा मिळवून देवू असे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. मराठवाडा मांद्रे येथे शिवसेना (Shiv Sena) कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत गोवा राज्य शिवसेना पक्षप्रमुख जितेश कामत,चिटणीस बाबली भास्कर नाईक ,संपर्क प्रमुख जीवन कामत, सरचिटणीस मिलिंद गावस,उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर (Sushant Pawaskar), महेश पेडणेकर, ऐश्वर्या साळगावकर, बाबुराव नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Sanjay Raut
Goa Election: काँग्रेसने केली 38 मतदारसंघांमध्ये गट अध्यक्षांची निवड

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना खासदार श्री संजय राऊत म्हणाले दिल्लीतून आप आणि पश्चिम बंगाल मधून तृणमूल काँग्रेस सारखा अगदी नवीन पक्ष जर गोव्यात निवडणूक लढवतो आम्ही तर गोव्याचे शेजारी आहोत गोवा व महाराष्ट्राचे अतूट नाते आहे.त्यामुळे या मैत्रीतून राज्यकर्ते निर्माण व्हावेत अशी रास्त अपेक्षा आम्ही बाळगून आहोत त्यात बाबली नाईक सारखे युवक शिवसेनेचे शिलेदार आहेत. शिवसेना नवीन स्वच्छ चेहरे देणार आहे किमान २२ जागा आम्ही लढू असे सांगून आमच्या शिवाय गोव्यात कुणाचेही सरकार होवू शकत नाही विधान सभेत आवश्यक संख्याबळ होण्यासाठी आमचे किमान आमदार सरकारमध्ये असतीलच आमच्या शिवाय सरकार होवूच शकणार नाही.

Sanjay Raut
Goa: केंद्र सरकार मदत करणार; केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे

शिवसेना गोव्यात बरीच वर्षे निवडणूक लढवते मात्र अद्याप खाते का खोलणे शक्य झाले नाही या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले शिवसेना केवळ आमदार निवडून आणण्यासाठी गोव्यात येत नाही तर समाजकारण हा शिवसेनेचा प्राण आहे.यश अपयश हा शिवसेनेचा मापदंड नाही.संघटन कौशल्यातून विकासाकडे वाटचाल करावी यासाठी शिवसेना बांधील आहे.गोवा आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा आम्ही प्रयत्न करू.शिवसेनेला कुणीही कमी समजू नये 2014 साली आम्ही गोव्यात केवळ 3 जागा लढवल्या गोव्यात भरघोस यश सत्तेवर आसलेल्या भाजपला ही मिळालेले नाही. गोवेकरांच्या भाग्यात असेल तर महाराष्ट्रात सत्तेत असलेली शिवसेना गोव्यातील सत्तेवर येवू शकते मात्र यावेळी आम्ही कुणा बरोबर युती वा आघाडी करणार नाही स्वबळावर निवडणूक लढवू आमचे आमदार निवडून आणु सरकार स्थापनेसाठी इतरांना आमच्याकडे यावच लागेल असेही ते म्हणाले.

Sanjay Raut
Goa: तृणमूल आणि फुटबॉल

स्थानिक नेतृत्व मराठीचा आग्रह धरीत नाही यावर आपले मत काय त्यावर ते म्हणाले महाराष्ट्रात जसा मराठी माणूस हा शिवसेनेचा श्वास आहे त्याप्रमणेच गोव्यात आमचे आमदार निवडून आल्यानंतर आम्ही मराठीच्या बाजूने खंबीरपणे निश्चितच उभे राहू असे ते म्हणाले यापुढे आम्ही वेगाने कार्य करून गोवा विधानसभेत पोचू असे सांगितले. श्री संजय राऊत यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. बाबली नाईक यांनी स्वागत केले.

Related Stories

No stories found.