प्रबोधन एज्युकेशनच्या अध्यक्षपदी संजय वालावलकर यांची निवड

prabhodini
prabhodini

पर्वरी

जिल्हा निबंधक आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रबोधन एज्युकेशन सोसायटीच्या आमसभा व व्यवस्थापन समितीची निवडणूक गुरुवार २५ जून रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या सभागृहात संपन्न झाल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून संजय वालावलकर, सचिव राजेन्द्र भोबे व कोषाध्यक्ष गुरुप्रसाद पाऊसकर यांची सर्वमताने निवड झाली. कार्यकारिणी समितीमध्ये श्रीपाद पाटणेकर, विठ्ठल पर्रीकर, दत्ता भि. नाईक, उल्हास अस्नोडकर, सुरेश बोरकर व मिनानाथ उपाध्ये यांना सामावून घेण्यात आलेले आहे. या व्यवस्थापन समितीची घोषणा निवडणूक अधिकारी सुरज वेर्णेकर यांनी केले.
स्वाती केरकर व अन्य ७ जणांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या सदस्यत्व बहालीकरणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे सदर याचिका जिल्हा निबंधकाचे तसेच संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय वालावलकर यांचे मत ऐकून घेण्याचे ठरवलेले आहे.
सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाने विद्या प्रबोधिनी शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग तसेच समाजामध्ये २५ जून रोजी झालेल्या आमसभा व व्यवस्थापन समिती निवडणुकीबाबत गैरसमज पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या नवनिर्वाचित समितीस स्थगिती दिलेली आहे, असे भासवण्याचा प्रयत्न करून अपप्रचारास खतपाणी घालत आहेत. हे पत्रक सर्व समाजामध्ये व कर्मचारी वर्गात सोशल मिडियाच्या माध्यमातून पसरवून त्यांना भ्रमित करत आहेत. सुभाष वेलिंगकर यांचे सचिवपद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयापासून रद्द झाले आहे, तरीसुद्धा ते प्राथमिक विभागाचा क्लार्क अंजूश पाळणी यांचा गैरवापर करून आपण सचिवपदी असल्याचे सगळ्यांना भासवत आहेत. खरे पाहता २५ रोजी झालेल्या निवडणूक जिल्हा निबंधक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पार पडलेल्या आहेत तरीसुद्धा सुभाष वेलिंगकर सर्व कर्मचाऱ्यांनी त्याचे ऐकून काम करावे, या उद्देशाने खोटे बोलून आपणच सचिवपदी आरूढ आहोत, असे भासवत आहेत. सुभाष वेलिंगकरांचे सदर प्रसिद्धीपत्रक हे अपप्रचार करणारे खोटे वक्तव्य करणारे व गैरसमज पसरवणारे आहे, याची खात्री सर्व कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावी, सुभाष वेलिंगकरांना सर्व सदस्यांना पाठवलेल्या पत्रातून १२ जुलै २०२० रोजी स्वघोषित केलेल्या आमसभा व निवडणूक घेण्याचे कसलेही अधिकार त्यांना दिलेले नाहीत. सर्व सदस्यांनी याची दखल घेऊन सुभाष वेलिंगकर घालत असलेल्या गोंधळात सहभागी होऊ नये. तसेच सुभाष वेलिंगकरांच्या अपप्रचाराला बळी पडून त्यांच्या खोट्या बोलण्याच्या आहारी जाऊ नये, असे आवाहन नवनिर्वाचित समितीचे अध्यक्ष संजय वालावलकर यांनी प्रसिद्धी पत्रकद्वारे केले आहे.

goa goa goa

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com