‘संजीवन वृध्दाश्रम’ मध्ये ज्येष्ठांना संजीवनी

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

‘संजीवन’ ने ज्येष्ठ नागरिकांना जगण्याची संजीवनी आणि उर्मी दिलेली आहे. संजीवनीत ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाचा आणि मायेचा ओलावा मिळतो. त्या साठीच ज्येष्ठ नागरिक आपले आयुष्य सुखासुखी जगू शकतात, असे प्रतिपादन प्रोबस क्लबचे अध्यक्ष अशोक कुरी यांनी केले.

बोरी: ‘संजीवन’ ने ज्येष्ठ नागरिकांना जगण्याची संजीवनी आणि उर्मी दिलेली आहे. संजीवनीत ज्येष्ठ नागरिकांना प्रेमाचा आणि मायेचा ओलावा मिळतो. त्या साठीच ज्येष्ठ नागरिक आपले आयुष्य सुखासुखी जगू शकतात, असे प्रतिपादन प्रोबस क्लबचे अध्यक्ष अशोक कुरी यांनी केले.

नागेशी बांदोडा येथील संजीवन वृध्दाश्रमात शनिवार १५ रोजी प्रोबस क्लब हिल टाऊन फोंडा आणि प्रोबस ट्रस्टतर्फे आयोजित केलेल्या वृध्दाच्या सत्कार समारंभाप्रसंगी कुरी बोलत होते.

याप्रसंगी प्रोबस ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे, संजीवनच्या अध्यक्ष आशा सावर्डेकर, सचिव रत्नाकर पैदरकर, नरहरी नाईक, गुणा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात कुरी यांनी संजीवन संस्थेच्या चाललेल्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ. आशाताई सावर्डेकर यांनी संजीवनमध्ये वृध्दांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीसंबंधी माहिती दिली. प्रोबस ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे यांचेही याप्रसंगी भाषण झाले. पाहुण्यांच्या हस्ते वृध्दाश्रमातील वृध्दांना भेटवस्तू आणि मिठाई वाटून त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी श्रेया कामत यांनी गीत सादर केले.

अशोक कुरी यांनी स्वागत केले रत्नाकर पैदरकर यांनी सूत्रसंचालन केले तर गुणा नाईक यांनी आभार मानले.

goa

संबंधित बातम्या