Sanjivani Sakhar: ऊस उत्पादकांचा गोवा सरकारला 24 नोव्हेंबरपर्यंत अल्टीमेटम; आंदोलनाचा इशारा

सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याचं केला आरोप
Sanjivani Sakhar
Sanjivani SakharDainik Gomantak

गोवा सरकारने संजीवनी साखरच्या सभासदांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत तसेच सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे अन्यथा येत्या अन्यथा 24 नोव्हेंबर रोजी आंदोलन करणार असल्याचे इशारा आज संजीवनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गोवा सरकारला दिला आहे.

( Sanjivani Sahakari Sakhar Karkhana farmers will protest against Goa government )

Sanjivani Sakhar
CM Pramod Swant: सभापती अन् मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्याचे कारण 'आयुर्वेद'

संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारच्या धोरणावर बोलताना एका शेतकऱ्याने म्हटले आहे की, कारखाना बंद काळात सरकारने पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने गतवर्षी पैसे दिले मात्र यंदाचे पैसे दिलेले नाहीत. यावर नाराजी दर्शवत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हे प्रकार सुरु असल्याचं म्हटले आहे.

एकत्र येत शेतकऱ्यांनी म्हटले की, ऊस उत्पादकाला देणे असलेली रक्कम 22 नोव्हेंबर पर्यंत दिली नसल्यास आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचं म्हटले आहे.

Sanjivani Sakhar
Goa News: ताळगावात एका तासात सातवेळा वीज खंडित

काही शेतकऱ्यांनी म्हटले की, संजीवनी साखर कारखान्याच्या मागील बाजुस असणाऱ्या जमिनीचा व्यवहार ही करण्यात आल्याचं समजले आहे. या व्यवहाराबद्दल एका ही शेतकऱ्याला माहिती नाही. हा व्यवहार सुमारे 15 लाखांचा झाला आहे.

व्यवहाराची माहिती जाणिवपुर्वक लपवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच ''व्यवहार करता तर रितसर शेतकऱ्यांची बैठक बोलवावी अन् त्यामध्ये ठरेल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा'' असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या अल्टीमेटम पर्यंत गोवा सरकार शेतकऱ्यांचे पैसे जमा करणार का? हे पहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com