‘संजीवनी’च्या कामगारांना वेतनाची प्रतीक्षा

Dainik Gomantak
मंगळवार, 19 मे 2020

कारखान्याच्या सर्व कामगारांना अंदाजे चाळीस लाख रूपये मासिक वेतन वितरित करण्यात येते. 

फोंडा

सरकारने संजीवनी सहकारी साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना मासिक एप्रिलचे वेतन खात्यात जमा केले नसल्याने कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. कित्येक कामगारांना संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या मासिक वेतनावर विसंबून राहून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. यंदा संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद ठेवण्यात आला. त्यामुळे राज्यातील पिकवलेला ऊस खानापूरच्या लैला सहकारी साखर कारखान्यात अदाच झाली नाही. लॉकडाऊनमुळे लैला साखर कारखाना बंद आहे. सरकारने संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना मासिक मार्चपर्यंतचे नियोजित वेतन कामगारांच्या खात्यात जमा केले नसल्याने
कामगारवर्गात नाराजी पसरली आहे. कामगारांना कारखान्यातील मळीची विक्री करून वेतन खात्यात जमा करण्यात येणार असून त्याबाबत लागणाऱ्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून शुक्रवारपर्यंत कामगारांचे वेतन खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन कारखान्याचे प्रशासक यांनी कामगारांना दिले आहे. या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगारांना अंदाजे चाळीस लाख रूपये मासिक वेतन वितरित करण्यात येत असून लवकर राहिलेली ऊसांची बिलांची थकबाकी शेतकऱ्यांना अदा करण्यात येईल. यंदा खानापूरच्या लैला साखर कारखान्याला ऊस वाहतूक पुरवठा केलेला ट्रक मालकांना ठेकेदारांकडून उर्वरीत रक्कम त्वरित अदा करण्याची मागणी ऊस वाहतूकदारांनी बंद केली आहे.

 

 

संबंधित बातम्या