संकेत नार्वेकर यांनी दिले दोन हजार सापांना जीवदान

Sanket Narvekar
Sanket Narvekar

फोंडा

साप हा माणसांचा मित्रच असल्याचे सर्पमित्रांनी दाखवून दिले आहे. सापाला कुणी दुखवू नये. सापाला न मारता त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे. नागपंचमीला सापाच्या जागी मातीपासून तयार केलेल्या नागाची तसेच जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा काही ठिकाणी आजही टिकून आहे.
साप दिसला की लोक घाबरत असून त्यांना लोकांकडून मारण्याचा प्रयत्न होतो. परंतु संकेत नार्वेकर यांनी सापाचे रक्षण करून जीवनदान देण्यात आले. त्यात कोब्रासारख्या सापांचा समावेश येतो. त्यामुळे त्याला एकदा बोरी येथे एका कोबरा सापाने दंश केल्यामुळे आठ दिवस गोमॅकोत उपचार घ्यावे लागले. परंतु त्यातून बरे झाल्यानंतर परत लगेचच साप पकडण्याचा विक्रम त्यांनी केला आहे.
संकेत नार्वेकर यांनी धीर न सोडता परत साप पकडण्याच्या कामाला लागला. संकेत नार्वेकर यांनी लहान वयापासून पदरी कमी शिक्षण असताना किमान अठरा वर्षे सर्पमित्र अमृतसिंग याच्याकडे साप पकडण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. संकेत नार्वेकर यांनी आपण घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा दहा युवकांना करून दिला असून तेही आता सर्पमित्र बनले आहेत. सर्पमित्र संकेत नार्वेकर यांना रोज लोकांचे फोन येत असतात. त्याप्रमाणे ते रोज साप पकडण्यासाठी जात असतो. संकेत नार्वेकर यांना साप पकडण्याचा रस्ता कवळे येथील सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राध्यापिका उर्वशी कवळेकर यांनी दाखवला. त्याप्रमाणे त्यांनी धाडस करून आज ते खरे सर्प मित्र बनले आहेत. तसेच संकेत नार्वेकर हे भटक्या जनावरांना सेवा देण्याचे कार्य कुर्टीच्या संजीवनी व ज्ञान फाऊंडेशन गोवा चापटरच्या माध्यमातून करीत असून त्यात भटक्या गायींना सांभाळण्याचे काम ते सेवाभावी वृत्ती करीत आहेत. साप हे शेतकऱ्यांचे आणि आपणा सर्वांचेही मित्रच असल्याने सापाला न मारता त्याचे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संपादन - यशवंत पाटील

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com