साखळी-करासवाडा रस्‍ता होणार चकाचक

17 कोटींचा खर्च: मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते डांबरीकरण कामास प्रारंभ
साखळी-करासवाडा रस्‍ता होणार चकाचक
Sanquelim-Karaswada road Road Newsdainik gomantak

डिचोली: सुमारे 17 कोटी रुपये खर्च करून साखळी ते करासवाडा जंक्शनपर्यंतच्या मुख्य रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 21 किलोमीटर अंतराच्या या रस्त्याचे तीन टप्प्यात डांबरीकरणाचे काम होणार आहे. जनेतला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (Sanquelim-Karaswada road Road News)

कारापूर-तिस्क येथे या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरण कामाला सुरवात केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, कारापूर-सर्वणचे सरपंच दामोदर गुरव, पंच लक्ष्मण गुरव, उज्ज्वला कवळेकर, माजी सरपंच खारकांडे, मये भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, महिला नेत्या आरती बांदोडकर, बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे कार्यकारी अभियंता विलास तांबोस्कर, सहाय्यक अभियंता गजानन देसाई, कनिष्ठ अभियंता मयूर गावकर, कंत्राटदार शशीधरन आदी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.