सांताक्रुझ पंचायत क्षेत्र 5 दिवस बंद

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 4 मे 2021

राज्यात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाचे रुग्ण तसेच मृत्यूची संख्या यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सांताक्रुझ पंचायत क्षेत्र येत्या 5 ते 10 मे पर्यंत अंशतः बंद

पणजी: राज्यात(Goa) वाढणाऱ्या कोरोना(corona) संसर्गाचे रुग्ण तसेच मृत्यूची संख्या यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सांताक्रुझ (santacruz) पंचायत क्षेत्रातही कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या वाढत असल्याने येत्या 5 ते 10 मे पर्यंत अंशतः टाळेबंदीचा(Lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी 6 ते 11.30 वाजेपर्यंत पंचायत क्षेत्रातील दुकाने खुली असतील व त्यानंतर ती बंद ठेवण्याचा निर्णय पंचायतीने घेतला आहे. त्यासंदर्भातची नोटीस सरपंच नामदेव नाईक यांनी काढली आहे. (Santacruz Panchayat area in Goa closed for 5 days)

म.गो. पक्षाचे माजी आमदार प्राचार्य विनायक विठ्ठल नाईक यांचे निधन 

या अंशतः टाळेबंदीच्या काळात पंचायत क्षेत्रात असलेल्या सर्व अत्यावश्‍यक सेवा असलेली भाजी व फळांची दुकाने, किराणा मालाची दुकाने, सुपरमार्केट, घाऊक विक्रेते तसेच इतर दुकाने सकाळी 11.30 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहतील. लोकांनी या टाळेबंदीला सहकार्य करण्याचे आवाहन सरपंचांनी केले आहे. या अंशतः टाळेबंदीच्या काळात सांताक्रुझ परिसरात पोलिस तैनात करण्याची विनंती सरपंचांनी जुने गोवे पोलिस निरीक्षकांना पत्र पाठवून केली आहे.

गोव्यात नाइट पार्ट्या सुरू असल्याने किनारपट्टी भागात ड्रग्ज व्यवसाय जोमात

संबंधित बातम्या