गोवा फॉरवर्डचे उमेदवार संतोषकुमार सावंत पोलिसांच्या ताब्यात

खनिज वाहतूक रोखल्याप्रकरणी डिचोली पोलिसांची कारवाई
Santosh Kumar Sawant arrested
Santosh Kumar Sawant arrestedDainik Gomantak

डिचोली : गोवा फॉरवर्डचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. खनिज वाहतूक रोखल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Santosh Kumar Sawant arrested News Updates)

Santosh Kumar Sawant arrested
मतदारयादीतून नाव गायब, 88 वर्षीय महिलेचं थेट निवडणूक आयोगाला पत्र

खनिज पैरा-शिरगाव येथे खनिज वाहतूक रोखून पोलिसांना (Police) अडथळा आणल्याप्रकरणी गोवा फॉरवर्डचे उमेदवार संतोषकुमार सावंत यांच्यासह शिरगावमधील दहाहून अधिकजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनकर्त्यां विरोधात गुन्हाही नोंद करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

Santosh Kumar Sawant arrested
...आणि भरधाव कार थेट झाडीत घुसली!

स्थानिक ट्रकांना काम द्या, अशी मागणी करीत शुक्रवारी सकाळी संतोषकुमार सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिरगाव मधील ट्रकवाल्यांनी पैरा येथे खनिज वाहतूक रोखून धरली. डिचोली (Bicholim) पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई करताना पोलिसांना अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. उपलब्ध माहितीनुसार पैरा येथील चौगुले खाणीवरून (Mining) मयेहून डिचोलीमार्गे सुर्ला येथे हे खनिज नेण्यात येते. बाहेरील ट्रक आणून पैरा येथील चौगुले खाणीवरील ई-लिलावाच्या खनिजाची वाहतूक करताना गेल्या महिन्यात दोन वेळा स्थानिक ट्रकवाल्यांनी खनिज वाहतूक रोखली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com