सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सायकल रॅली पोळेत दाखल

146 व्या जयंती निमित्त काढलेल्या केरळ ते गुजरात पर्यंतच्या सायकल रॅलीचे (Bicycle Rally) पोळे येथे भव्य स्वागत करण्यात आले.
सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता सायकल रॅली पोळेत दाखल
Bicycle RallyDainik Gomantak

काणकोण: गोव्याच्या (Goa) दक्षिण सीमेवर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146 व्या जयंती निमित्त काढलेल्या केरळ ते गुजरात (Gujarat) पर्यतच्या राष्ट्रीय एकता सायकल रॅलीचे पोळे येथे भव्य स्वागत करताना उपसभापती इजिदोर फर्नांडीस (Ijidor Fernandes) बाजूला उपजिल्हाधिकारी उदय प्रभू देसाई, मामलेदार विमोद दलाल. सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या 146 व्या जयंती निमित्त काढलेल्या केरळ ते गुजरात पर्यंतच्या सायकल रॅलीचे (Bicycle Rally) पोळे येथे भव्य स्वागत करण्यात आले.

Bicycle Rally
Goa: जागतीक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बांबोळी येथील मनोरुग्णालयाची भेट

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 146 व्या जयंती निमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने काढलेल्या केरळ ते गुजरात पर्यतच्या सायकल रॅलीचे पोळे येथे उपसभापती इजिदोर फर्नांडीस यांनी पोळे सीमेवर भव्य स्वागत केले. यावेळी काणकोणचे उपजिल्हाधिकारी उदय प्रभू देसाई, मामलेदार विमोद दलाल उपस्थित होते.सकाळी 10 वाजता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील सोळा सायकलीस्ट व त्याच्या सोबत असलेल्या डझनभर अधिकाऱ्याचे राज्याच्या दक्षिण सीमेवर पोळे येथे उपसभापतीनी राज्य पोलिस दलाच्या बॅंडबाजाच्या पथकाने वाजवलेल्या सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा या धुनीच्या साथीने स्वागत केले. त्याचप्रमाणे त्याचे स्वागत करून त्याना राज्यात झेंडा दाखवून प्रवेश दिला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com