फातोर्ड्यात गॅस वाहिनीसाठी  रस्ते खोदण्यास सरदेसाईंचा विरोध

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

फातोर्डा मतदारसंघात स्वयंपाक गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदण्याच्या कामास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी विरोध दर्शवला आहे. रस्ते खोदल्यास फातोर्डावासीयांची गैरसोय होणार असून रस्ते खोदण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र सरदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग सहाच्या कायर्कारी अभियंत्यांना पाठवले आहे.

मडगाव  :  फातोर्डा मतदारसंघात स्वयंपाक गॅस वाहिनीसाठी रस्ते खोदण्याच्या कामास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी विरोध दर्शवला आहे. रस्ते खोदल्यास फातोर्डावासीयांची गैरसोय होणार असून रस्ते खोदण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे पत्र सरदेसाई यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग सहाच्या कायर्कारी अभियंत्यांना पाठवले आहे. इंडियन ऑईल अदानी गॅस कंपनीद्वारे घरगुती गॅसचा पुरवठा करण्यासाठी फातोर्ड्यात पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी फातोर्ड्यातील मुख्य व अंतर्गत रस्ते फोडण्यात येणार आहेत.

 राज्य सरकारची आर्थिक स्थिती ठीक नसल्याने रस्ता दुरुस्तीही होणार नाही व त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागेल, असे सरदेसाई यांनी या पत्रात म्हटले आहे.  फातोर्ड्यातील नागरिकांनी बीबीसीएल व एचपीसील कंपनींकडून आवश्यक त्या प्रमाणात गॅसचा पुरवठा होत असून या स्थितीत गॅसची पाईपलाईन टाकण्याची गरज नाही, असेही सरदेसाई यांनी पत्रात नमूद केले आहे.  फातोर्ड्यात कोणत्या ठिकाणी कोणत्या खात्याचा वाहिन्या आहेत ते स्पष्ट करणारा नकाशा उपलब्ध नाही.  रस्त्याच्या खालून तसेच भूमिगत मार्गाने पाणी पुरवठा, बीएसएनल, भूमिगत विजवाहिन्या त्यामुळे गॅस पाईपलाईनसाठी रस्ते खोदल्यास या वाहिन्यांचे नुकसान होण्याचा व नागरिकांना पुन्हा मनस्ताप होण्याचा धोका आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
 

संबंधित बातम्या