Adv. Amit Sawant
Adv. Amit SawantDainik Gomantak

Mandrem Sarpanch: मांद्रेच्या सरपंचपदी ॲड. अमित सावंत बिनविरोध

कोनाडकर यांच्यावर 24 तासांत दाखल झाला होता ‘अविश्‍वास’

मोरजी: मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात 24 तास उलटण्यापूर्वीच अविश्वास ठराव आणून तो मंजूर झाल्यानंतर आज ॲड. अमित सावंत यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. या नाट्यमय घडामोडीत ही पंचायत माजी आमदार दयानंद सोपटे यांच्याकडून हिसकावून घेण्यात स्थानिक आमदार जीत आरोलकर यशस्वी ठरले आहेत.

(Sarpanch of Mandre Adv. Amit Sawant unopposed)

Adv. Amit Sawant
Goa Crime: धक्कादायक! राज्यात ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ

ज्या महेश कोनाडकर यांच्यावर पंच सदस्यांनी विश्वास दाखवून त्यांना बिनविरोध निवडून आणले, त्याच कोनाडकर यांच्यावर 24 तासांच्या आत अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्याचा इतिहास मांद्रे पंचायत मंडळाने घडविला आहे. आता उपसरपंच चेतना पेडणेकर यांच्यावर अविश्वास ठराव येण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांच्या जागी तारा हडफडकर यांची निवड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रशांत नाईक, तारा हडफडकर, शेरॉन अमरोष फर्नांडिस, रॉबर्ट फर्नांडिस, किरण सावंत, मिंगेल फर्नांडिस आणि अमित सावंत या पंच सदस्यांनी सरपंच महेश कोनाडकर यांच्या विरोधात मतदान करून त्यांना पायउतार केले, तर उपसरपंच चेतना पेडणेकर, संपदा आजगावकर, राजेश मांद्रेकर व महेश कोनाडकर या चारजणांचा दुसरा गट बनला आहे.

सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर मागच्या दहा दिवसांपासून अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार करण्यासाठी एकूण सात पंच सदस्यांनी प्रयत्न सुरू केले होते. या सातही पंच सदस्यांनी रेडी येथील स्वयंभू गणेश मंदिराच्या ठिकाणी जाऊन आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत देवासमोर शपथ घेऊन पुढील रणनीती ठरवून अलिखित करार केला.

Adv. Amit Sawant
Ganesh Chaturthi: कुंभारजुवेत रंगला सांगोडोत्सव

त्यानुसार आज अमित सावंत यांची दोन वर्षांसाठी सरपंच म्हणून निवड करण्यात आली, तर उर्वरित काळात इतर पंच सदस्यांना सरपंच आणि उपसरपंचपद वाटून देण्यात येणार असल्यामुळे पाच वर्षासाठी संगीत खुर्चीचा खेळ चालूच राहणार आहे.

‘बेकायदा बांधकामांवर कारवाई’

किनारी भागात जी देवस्थाने आहेत आणि ज्या देवस्थान परिसरात जी बेकायदेशीर बांधकामे चालू आहेत, त्या बांधकामांसंदर्भात देवस्थान महाजन समितीने पंचायतीला लेखी निवेदन सादर केले, तर योग्य पद्धतीने कारवाई केली जाईल, असे नवनिर्वाचित सरपंच अमित सावंत यांनी सांगितले.

विकास हेच लक्ष्य: जीत आरोलकर

आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या समर्थकांचा एक गट स्थापन करून पंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले, त्यावेळी किरण सावंत यांना सरपंचपद देण्याचे ठरले होते, तरीही अमित सावंत यांची सरपंचपदी निवड का केली असे विचारले असता, आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की राजकारणात बदल घडत असतात आणि त्यानुसार हा बदल झाला आहे. सरपंचपद कोणाला यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन मांद्रे पंचायतीचा आणि पर्यायाने मतदारसंघाचा विकास आपण करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com