Sateri Devi Temple Theft: अजब चोरांची गजब कहाणी! सर्वणमधील मंदिरात मौल्यवान वस्तूंसोबतच सीसीटीव्हीही चोरला

राज्यात चोरांनी मंदिरे लुटण्याचा सपाटाच सुरू केला आहे
Sateri Devi Temple Theft
Sateri Devi Temple TheftDainik Gomantak

Sateri Devi Temple Theft: मागील काही महिन्यांमध्ये राज्यात चोरांची टोळी सक्रिय झाली असून त्यांनी मंदिरे लुटण्याचा सपाटाच सुरू केला आहे. डिचोली सर्वण येथील श्री सातेरी देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sateri Devi Temple Theft
गणेशोत्सवाच्या आधी गोव्यात हत्तीचे दर्शन...! व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

यामध्ये चोरांनी मंदिरातील चांदीचे मुकुट तसेच इतर अलंकारांसह लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. पण गंमत म्हणजे, चोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी चक्क मंदिरातील सीसीटीव्हीही चोरला असल्याचे सांगण्यात येत आहे.

चोरांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही हा पोलिसांकडील सगळ्यात महत्वाचा मार्ग असतो. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजवरून, पोलीस चोरांचा तपास करू शकतात. कदाचित हेच लक्षात आल्याने, चोरांनी सीसीटीव्ही देखील लंपास केला आहे.

दरम्यान, डिचोली पोलीस संबंधित घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com