सातेरी पंचायत पालखी उत्सव 28 मार्च पासून

सकाळी 8 वाजता देवीची मंदिरातून संपूर्ण गावात पालखी मिरवणूक होईल.
श्री सातेरी पंचायत देवस्थानच पालखी उत्सव
श्री सातेरी पंचायत देवस्थानच पालखी उत्सवDainik Gomantak

म्हापसा: पोडवाळ-खोर्जुवे येथील श्री सातेरी पंचायत देवस्थानचा पालखी उत्सव तसेच 21 वा वर्धापनदिन सोमवार दि. 28 मार्चपासून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 28 रोजी सकाळी 8 वाजता देवीची मंदिरातून संपूर्ण गावात पालखी मिरवणूक होईल. मंगळवार दि. 29 रोजी श्रींच्या 21 व्या मूर्तिपुन:प्रतिष्ठापना व वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त पुरुषोत्तम जोशी यांच्या पौरोहित्याखाली तसेच सुहास फडते यांच्या यजमानपदाखाली विविध धार्मिक विधी, त्यानंतर महाआरती व दुपारी महाप्रसाद होईल. संध्याकाळी 7 वाजता श्रींची पालखी मिरवणूक व दीपोत्सव होणार आहे.

श्री सातेरी पंचायत देवस्थानच पालखी उत्सव
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पणजीत सायकल रॅली

बुधवार दि. 30 रोजी सकाळी कुंकुमार्चन, दुपारी 3 वाजता काशिनाथ शिरोडकर यांच्या यजमानपदाखाली श्री सत्यनारायण महापूजा तर रात्री 8 वाजता कोंकणी नाटक ‘आगळें तूं वेगळें हांव’ सादर करण्‍यात येईल. चौथ्या दिवशी दि. 31 रोजी दुपारी 3.30 वाजता खोर्जुवे मर्यादित चित्रकला स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 8 वाजता महामाया दिंडी पथक मये यांच्या वतीने दिंडी कार्यक्रम सादर होणार आहे.

शुक्रवार दि. 1 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता खोर्जुवे मर्यादित महिलांसाठी पाककला स्पर्धा, तर रात्री 8 वाजता खोर्जुवे मर्यादित मुलांसाठी वेशभूषा व नृत्य स्पर्धा होणार आहे. शनिवार दि. 2 रोजी दुपारी 3 वाजता संवत्सरफल वाचन झाल्यानंतर सभासदांची वार्षिक सभा होईल. सभेनंतर पावणीने विविध कार्यक्रमांची सांगता होईल.भाविकांनी उत्‍सवाला मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती लावावी, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com