विद्यालयांच्या व्यवस्थेचा आढावा घेऊन गोवा शिक्षण संचालकांनी व्यक्त केले समाधान

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

कोविड्च्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या पेडणे तालुक्यातील माध्यमिक तसेच उच्चमाध्यमिक विद्यालयाना मंगळवारी सकाळी शिक्षण संचालक संतोष आमोणकर आणि उपशिक्षण संचालक भगीरथ शेट्ये यांनी प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली

पेडणे : कोविड्च्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या पेडणे तालुक्यातील माध्यमिक तसेच उच्चमाध्यमिक विद्यालयाना मंगळवारी सकाळी शिक्षण संचालक संतोष आमोणकर आणि उपशिक्षण संचालक भगीरथ शेट्ये यांनी प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली .यावेळी त्यांनी पेडणे तालुक्यातील श्री कमलेश्वर  माध्यमिक तथा उच्चमाध्यमिक विद्यालय ,हरमल पंचक्रोशी उच्चमाध्यमिक विद्यालय ,पेडणेच्याच्या श्री भगवती हायस्कूल तसेच अन्य विद्यालयाना  भेटी देवून व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. 

या विद्यालयात उपस्थित असलेल्या विध्यार्थांच्या समाधान कारक उपस्थिती बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. काही विद्यालयात त्यांनी प्रत्यक्ष वर्गाना भेटी दिल्या व  विध्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षण खात्याने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होते कि नाही याचीही पडताळणी केली.विद्यालये सुरु केल्याबद्दल काही विध्यार्थांच्या प्रतिक्रियाही त्यांनी जाणून घेतल्या यावेळी विध्यार्थ्यानी शाळा सुरु झाल्याबद्दल आम्ही आनंदी आणि उत्साही असल्याचे सांगून ऑनलाइन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष  वर्गातील शिक्षणच आम्हा विध्यार्थ्यांना योग्य असल्याचे सांगितले 
गोवा सरकार आणि शिक्षण खात्याने विद्यालाये सुरु करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे यावेळी विध्यार्थ्यानी सांगितले तसेच शिक्षणाबद्दल आस्था आणि विध्यार्थ्याबाद्द्ल जिव्हाळा असलेले आपल्यासारखे शिक्षण अधिकारी या राज्याला लाभल्याचे समाधान यावेळी विद्यार्थानी व्यक्त केले .

यावेळी शिक्षण संचालक संतोष आमोणकर व उपशिक्षण संचालक भगीरथ गावकर यांनी प्राचार्य तसेच शिक्षकांशी चर्चा केली तसेच आवश्यक ती खबरदारी घेण्याविषयी सूचनाही केल्या तसेच विध्यालायानी शिक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल समाधान व्यक्त केले 

कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्चमाध्यमिक विद्यालयात  प्राचार्य सुदन  बर्वे यांनी शिक्षण संचालक संतोष आमोणकर  व उपसंचालक भगीरथ गावकर यांचे स्वागत केले तसेच त्यांना विद्यालयातील वर्गखोल्या दाखवल्या. त्यात शिक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत एकेका वर्गात १२-१२ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केल्याचे दाखवून दिले तसेच यावेळी प्राचार्य श्री. बर्वे यांनी विध्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शाळेच्या बाल रथांचा उपयोग करूनच शाळेत आणले आणि पोचवले जात असल्याचे सांगितले त्यासाठी विद्यार्थ्यांची गावाप्रमाणे विभागणी केल्याचे सांगितले एकूण विद्यार्थ्यापैकी ५० टक्के विद्यार्थी एक दिवस आणि उरलेले विद्यार्थी  दुसऱ्या दिवशी आळीपळीने उपस्थित राहत असल्याबद्दल शिक्षण संचालकांच्या नजरेस आणून दिले. या व्यवस्थेबद्दल शिक्षण संचालकांनी समाधान व्यक्त करून विध्यार्थ्यांच्या प्रथम सत्र परीक्षा न घेतल्यास त्या घ्याव्यात अश्या सूचनाही केल्या.

दरम्यान देऊळवाडा कोरगाव येथील श्री कमलेश्वर हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक भालचंद्र हिरोजी यांनी शिक्षण संचालकांचे स्वागत करून त्यांना व्यवस्थे विषयी माहिती दिली. त्यानंतनर शिक्षण संचालक  व उपसंचालक पेडणे येथील श्री भगवती विध्यालयात गेले तत्पूर्वी त्यांनी हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट दिली.

संबंधित बातम्या