खाणप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर समाधानी : राज्यपाल

प्रतिनिधी
रविवार, 16 ऑगस्ट 2020

राज्यातील खाणी सुरू व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हरसंभव प्रयत्न करत आहेत. हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या विचारार्थ असून राजकीय मार्गानेही त्यावर उपाय शोधला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर मी समाधानी असून माझा त्यांना या विषयात पाठींबाच आहे, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज सांगितले.

पणजी: , ता. १४ (प्रतिनिधी)ः राज्यातील खाणी सुरू व्हाव्यात, यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हरसंभव प्रयत्न करत आहेत. हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या विचारार्थ असून राजकीय मार्गानेही त्यावर उपाय शोधला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांवर मी समाधानी असून माझा त्यांना या विषयात पाठींबाच आहे, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज सांगितले.

ते म्हणाले, खाण भागातील पंचांनी माझी भेट घेतली.  त्यांनी सांगितले, की खाणी बंद झाल्यामुळे  बेरोजगारी निर्माण झाली, नैराश्य आले आहे, कुटुंबाचा गाडा हाकताना अडचणी येत आहेत. ते खरे आहे. त्यांनी खाण भागातील चित्र माझ्यासमोर उभे केले. त्या साऱ्याची मला कल्पना आहे. सर्वोच्च न्यायालयात काय होईल सांगता येणार नाही. राज्य सरकारची भूमिका योग्य आहे असे मला वाटते. खाणकाम बंद झाल्यामुळे सरकारचा महसूल घटला आहे. त्याचा विकासावर निश्चितपणे परिणाम झाला आहे. मानसिक अशांती बेरोजगारीमुळेच नव्हे तर कोविड टाळेबंदीमुळेही निर्माण झाली आहे. खाणी सुरु करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील याचिकांद्वारे आणि संसदीय मार्गानेही प्रयत्न सुरु आहेत. जनतेने खाणी सुरु होतील याविषयी आश्वस्त रहावे. सरकार करत असलेल्या प्रयत्नांना मी मदत करत आहे. कायदेशीर मार्गाने खाणी सुरु झाल्या तर उत्तमच अन्यथा संसदीय मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. पर्यावरण संरक्षण हवेच पण त्यासाठी कोणाची रोजीरोटी हिरावून घेतली जाऊ नये. दोहोंत समन्वय हवा असे मला वाटते असे त्यांनी बोलताना नमूद केले.

goa

संबंधित बातम्या