सत्तरीतून अठरा रामभक्त पोहचले होते अयोध्येत

Padmaker kelkar
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

राम मंदिरासाठी हे आंदोलन आवश्यक होते. म्हणून संसदेत विशेष कायदा करण्यात आला होता. अयोध्येतील रामजन्म भूमी ही हिंदूंना द्यावी अशी मागणी होती. त्यासाठी या रँलीची हाक संतांच्या उच्चाधिकारी समितीने दिली होती.

वाळपई , :
17 आँक्टोबर 2003 साली अयोध्येत रामजन्म भूमीसाठी रँली काढण्यात आली होता. त्या रँलीत सत्तरी तालुक्यातून अठरा रामभक्तांनी सहभाग घेऊन आंदोलनासाठी योगदान दिले होते. राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी संकल्प बध्द अशा लक्षावधी रामभक्तांचे शक्तीप्रदर्शन सतरा वर्षा अगोदर अयोध्येत झाले होते. राम मंदिरासाठी हे आंदोलन आवश्यक होते. म्हणून संसदेत विशेष कायदा करण्यात आला होता. अयोध्येतील रामजन्म भूमी ही हिंदूंना द्यावी अशी मागणी होती. त्यासाठी या रँलीची हाक संतांच्या उच्चाधिकारी समितीने दिली होती. त्यात सत्तरीतून म्हाळू गावस (मासोर्डे) यांच्या नेत्ुत्वाखाली अजीत गावस व पांडूरंग गावस (चरावणे), रमेश गावस व विजय गावस (हिवरे खुर्द), अजित खोत व न्यानेश्वर खोत (गोळावली), नवनाथ माईणकर व संदेश मणेरकर (वाळपई), धनंजय ओझरेकर व महेश बोट्टरकर (नगरगाव आंबेडे), अर्जून गावडे (करंझोळ), राजेश गावकर (सुरुंगुली), कु. सविता गावकर व गजानन नाईक (ठाणे), संतोष म्हाळशेकर (वेळगे), सोमनाथ गावडे (कुमठोळ), सोमनाथ गावस (नगरगाव आंबेडे) असे अठरा जण रामभक्त अयोध्येत रँलीत गेले होते. तिथे त्यांना प्रत्यक्ष रामजन्म भूमी स्थळांचे दर्शन झाले होते. म्हाळू गावस म्हणाले सतरा वर्षा अगोदर आम्ही अठरा जण अयोध्येत गेलो होतो. यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिरासाठी भूमीपूजन केले आहे. आम्हाला या आंदोलनात सहभागी झाल्याचा सार्थ अभिमान आहे. व याचे चांगले फलित मिळाल्याचा मोठा आनंद मिळाला आहे. त्यावेळी रँलीवेळी अनेक अनूभव आले होते. राम हे आमचे श्रध्दास्थान आहे. ते स्वप्न येत्या तीन वर्षात पूर्ण होणार आहे. व राम मंदिर बांधून झाल्यावर आम्ही पुन्हा श्रीराम दर्शनासाठी जाणार आहोत असे गावस म्हणाले. त्या आधीदेखील 1990, 1992 साली झालेल्या कारसेवक आंदोलनावेळी अन्य काही जण सत्तरीतून अयोध्येत पोहचले होते.
 

संबंधित बातम्या