Goa Agriculture: सत्तरीमधील कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न

वाळपईत बैठक- कृषीविषयक विविध विषयांवर चर्चा; शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Goa Agriculture
Goa AgricultureDainik Gomantak

Goa Agriculture: विभागीय कृषी कार्यालय, वाळपई आणि कृषी तंत्रज्ञान योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॉक शेतकरी सल्लागार समितीतर्फे गुरुवारी शेतकऱ्यांसाठी खास कृषी खात्याच्या विविध योजना व उत्पादन यासंबंधीची बैठक येथील कृषी कार्यालयात झाली. त्यात शेतकरी आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर कृषी तंत्रज्ञान योजनेचे उत्तर गोवा प्रकल्प संचालक किशोर भावे, वाळपई विभागीय कृषी खात्याचे कृषी अधिकारी तथा ब्लॉक टेक्नॉलॉजी कॅन्व्हनरचे अधिकारी विश्वनाथ गावस, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. गावठणकर, आत्माचे पृथ्वीराज नाईक उपस्थित होते.

वाळपई कृषी अधिकारी विश्वनाथ गावस म्हणाले, गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक तत्त्वावर पावसाळ्यात नाचणी पीक घेतले होते. त्याचा लाभ झाला. पूर्वीच्या काळी नाचणी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे मात्र कालांतराने वाढणाऱ्या महागाईमुळे शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले होते.

मात्र आता कृषी खात्याचे प्रोत्साहन व कृषी क्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे पुन्हा लोक शेतीकडे वळू लागले आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने गेल्यावर्षीचे वर्ष नाचणी पीक वर्ष म्हणून घोषित केले होते. यंदा पुन्हा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाचणी पीक घ्यावे.

डाॅ. गावठणकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतात हिरवा चारा, मका गुरांसाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याची लागवड करून आपल्या जनावरांपसून दुग्ध उत्पादन क्षमता वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा होऊ शकतो याबद्दल सांगितले. तसेच लंपी रोग व त्यावरील उपाय याबाबत उपयुक्त माहिती दिली.

यावेळी शेतकरी आनंद मेळेवर यांनी मधमाशी पालन व त्याचे बाजारात मिळणारे भाव आणि शेतकऱ्यांनी मधमाशी पालन करावे याबद्दल सांगितले.

Goa Agriculture
Som Yag Yadnya 2023: गोमंतकीयांनी 'या' कारणांसाठी सोमयागात सहभागी व्हावं!

कृषी योजनेबद्दल सविस्तर माहिती

आत्माचे प्रकल्प संचालक किशोर भावे यांनी शेतकऱ्यांना कृषी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. सत्तरीत मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्राखाली लागवड करुन आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारता येते याबद्दल सांगितले.

सत्तरीत मिरी, नाचणी, त्याचबरोबर भाजी लागवड करताना कृषी खात्याकडे अनेक योजना आहेत. जायफळलाही बाजारपेठात भरपूर मागणी आहे. यंदा प्रात्यक्षिक तत्त्वावर शेतकऱ्यांनी जायफळ लागवड करुन पहावे जेणेकरुन येणाऱ्या दिवसात त्याचा शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com