Goa Environment: भूकंप आणि पूरपरिस्थितीची सत्तरी परिसराला भीती

तज्ज्ञांचे मत : पाणी वळविल्यास सत्तरीवर आक्रित येणार; प्रकल्पांबाबत वन खाते अनभिज्ञ कसे?
Sattari |Goa Environment
Sattari |Goa EnvironmentDainik Gomantak

Goa Environment: 1985 पासून म्हादईबाबत कर्नाटकच्या विवादास्पद हालचाली सुरूच आहेत. सगळे कायदेकानून धाब्यावर बसवून कर्नाटकने कळसा नाल्याचा प्रवाह वळवून मलप्रभा नदीच्या पात्रात कणकुंबी येथे नेलेला आहे.

त्यामुळे हलतरगा व भांडुरावर विविध प्रकल्प व लघुधरणांच्या स्वरूपात पाटबंधारे बांधून पाणी मलप्रभेच्या पात्रात वळविण्याचे कर्नाटकचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. असे जर त्यांचे प्रकल्प घाटमाथ्यावर झाले तर संपूर्ण सत्तरी तालुक्याभोवती भूकंपप्रवण क्षेत्र निर्माण होऊ शकते, असा इशारा राजेंद्र केरकर व इतर तज्ज्ञांनी दिला आहे.

भीमगड अभयारण्यात देवबाग येथे उगम पावलेली म्हादई नदी आपल्याबरोबर आपले बरेच भाऊबंद घेऊन गोव्यात दाखल होते. ज्यात कळसा नाला, सुर्ला नाला, हलतरा नाला इत्यादी विविध लहान-मोठ्या नद्या, नाले म्हादई नदीस येऊन मिळतात.

पण सद्यस्थितीत कर्नाटकच्या आतताई धोरणामुळे किंवा त्यांच्या विविध नाल्यांच्या मार्गबदलामुळे म्हादई नदी आकसण्याची भीती निर्माण झालेली आहे.

कर्नाटकचे हे प्रकल्प म्हादईच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे म्हादई अभयारण्यातील वन्यप्राण्यांचा अधिवास ते बदलू शकतात. मोठ्या प्रमाणात जंगली जनावरे लोकवस्तीमध्ये येऊ शकतात.

गोव्याच्या सीमेपासून अवघ्या काही मीटर अंतरावर होऊ घातलेले हे प्रकल्प म्हणजे भविष्यातील पाणी टंचाई व पर्यावरणीय असमतोल यांची नांदी ठरेल, असेही तज्ज्ञ बजवतात. पण एवढ्या मोठ्या प्रकल्पांबद्दल वन खाते अनभिज्ञ कसे काय असू शकते? हे एक कोडेच आहे.

Sattari |Goa Environment
Goa Police: गोवा पोलिसांकडून 5 बांगलादेशींची थेट मायदेशी पाठवणी

...तरीही हव्यास

म्हादईच्या खोऱ्यातील एकूण पाणलोट क्षेत्रातील पंधरा टक्के क्षेत्र कर्नाटकच्या ताब्यात आहे. त्यातील बराचसा भाग हा भीमगड संरक्षित अभयारण्यात आहे. तरीही कर्नाटकने नेहमीच्याच आक्रमक, बेजबाबदार व अविश्वासू स्वभावामुळे म्हादईचे पाणी पळविले आहे.

जनजागृती गरजेची

म्हादई जर वाचवायची असेल तर सत्तरीतील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन जनजागृती करणे गरजेचे आहे. नाही तर हिमालयामध्ये सरस्वती, गंगा नद्या जशा लुप्त झाल्या, तशीच आमची म्हादई सह्याद्रीच्या पर्वतरांगेत लुप्त होऊन जाईल आणि नंतर ती फक्त कथांमध्ये आम्हाला ऐकायला मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com