
म्हादई गोव्याची जीवनदायिनी आहे. तिला कोणीही अडवायचा वा तिचे पाणी वळवायचा प्रयत्न करू नये. यासाठी गुढी पाडवा आणि आंतरराष्ट्रीय पाणी दिनाचे औचित्य साधून सेव्ह म्हादई चळवळीतर्फे मांडवी किनाऱ्यावर सर्वधर्मीय ब्लेसिंग, फात्याह आणि महाआरती करण्यात आली. म्हादईला असेच नैसर्गिकरित्या वाहू देण्याचे आवाहन करण्यात आले.
केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकाच्या कळसा भांडुरा प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्यात असंतोषाचे वातावरण आहे. सेव्ह म्हादई चळवळीतर्फे या विरोधात अनेक प्रकारची आंदोलने सुरू आहेत.
याचाच भाग म्हणून चळवळीतर्फे आज मांडवी तीरावर सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार फादर मोझीन्हो आतायत यांनी गाऱ्हाणे आणि ब्लेसिंग केले तर सलमान खान यांनी ‘फात्याह’ म्हटल्यावर मंजुनाथ वैद्य यांनी मांडवीच्या आरती केली.
यावेळी हृदयनाथ शिरोडकर, प्रजल साखरदांडे, महेश म्हामरे, समिल वळवळईकर, तारा केरकर, वाल्मिकी नाईक, तनोज अडवळपालकर , शंकर पोळजी यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.