SBI Fraud Case: गोव्यात बॅंक खातेदारास बोगस कॉलद्वारे तब्बल '91' हजारांचा गंडा

SBI Fraud Case: नूकसान भरपाई बँकेने भरुन द्यावी,अशी मागणी संबंधित खातेदाराने केली आहे.
Bank Fraud
Bank FraudDainik Gomantak

SBI Fraud Case: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदाराने आपल्या एटीएम क्रमांकाची माहिती बोगस कॉल सेंटरमधून आलेल्या कॉलवर दिल्याने फसगतीचा अनुभव आला. क्रेडिट कार्ड सेंटरमधून कॉल (ट्रू कॉलर नाव) आल्याने साहजिकच आपण माहिती दिल्याचे खातेदाराने सांगितले. या खातेदाराच्या खात्यातून तब्बल 91 हजार रुपये लंपास झाले आहेत. ही हानी बँकेने भरून द्यावी,अशी मागणी संबंधित खातेदाराने केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठवड्यात या भागातील एका युवकाला स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्ड सेंटरमधून कॉल आला. एटीएम कार्ड अद्याप का कार्यान्वित केले नाही,अशी विचारणा केली. सदर युवकाने आपणास क्रेडिट कार्ड कार्यान्वित करायचे नाही, घराचे काम पूर्ण झाल्यानंतर कार्यान्वित करू, असे सांगितले. त्यासरशी पलिकडून बोलणाऱ्या अज्ञाताने आपण ब्लॉक करण्यास मदत करतो,कार्ड नंबर सांगा, असे सांगताच युवकाने त्वरित कार्ड नंबर सांगितला.

Bank Fraud
Kulem: खांडेपार कालव्यालगत अतिक्रमण केल्यास, तर ते मोडून काढणार सुभाष शिरोडकरांचा इशारा!

कार्ड ब्लॉक केल्याच्या खात्रीने सदर युवक निश्‍चिंत होता.मात्र दुसऱ्या दिवशी मोबाईलवर मेसेज पाहताच खात्यातून तब्बल 91 हजार रुपये निघाल्याचे पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर संबंधित क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला,पण तो स्वीच ऑफ असल्याचे आढळून आले. त्यानंतर या युवकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने हरमल आऊट पोस्ट पोलिसांकडे तक्रार नोंदवून सायबर गुन्हे विभागाने याप्रकरणी तपास करून रक्कम मिळवून द्यावा,अशी विनंती केली आहे.

बॅंकांनी सूचित करूनही...!

बॅंक, वित्तीय संस्था कोणाही अनोळखी व्यक्तीला आपल्या डेबिट वा क्रेडिट कार्डाची माहिती देऊ नका,असा संदेश देत असते. मात्र, बॅंकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने अशी फसगत होऊ शकते,त्यामुळे आपली डेबिट वा क्रेडिट कार्डाची तसेच खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये,असे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले. बॅंका कधीही डेबिट वा क्रेडिट कार्डाशी संबंधित माहिती फोनवरून घेत नाहीत,असे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com