गोव्यातील ‘कोरोना’ प्रतिबंधक लसीकरणात गौडबंगाल!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘कोविड’ प्रतिबंधक लस सरकारी तसेच  खासगी इस्पितळांमधून कोरोना योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यास सुरवात झाली आहे.

पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘कोविड’ प्रतिबंधक लस सरकारी तसेच  खासगी इस्पितळांमधून कोरोना योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यास सुरवात झाली आहे. केंद्र सरकारने या लसीकरणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून खासगी इस्पितळात बिगर आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिल्याची प्रकरणे उघडकीस आल्याने त्याची चौकशी उच्चस्तरावर सुरू झाली आहे. ज्यांना ही लस देण्यात आली आहे, त्यांची माहिती मिळविली केली जात आहे.

म्हादईप्रश्‍नी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा पर्दाफाश; विरोधकांकडून राजीनाम्याची

कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी निवड केलेल्या खासगी इस्पितळांविरुद्ध बिगर आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लस देण्यात आलेल्यांची नावे ‘कोविन पोर्टल’वर नोंदणी झालेली नाहीत. याप्रकरणाची गंभीर दखल राज्य तसेच केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे या इस्पितळांना ही लस देण्यासाठीचा आलेला परवाना आरोग्य खात्याला रद्द करावा लागेल आणि त्यामुळे या कोविड लसीकरणाच्या कार्यक्रमात अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इस्पितळामध्ये किंवा दवाखान्यामध्ये बिगर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार नाही व या लसीसाठी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्‍वांचे उल्लंघन होत नाही, याकडे लक्ष देण्याची विनंती आरोग्य खात्याने इंडियन मेडिकल असोसिएशनला (आयएमए) केली आहे. 

मार्गदर्शक तत्त्‍वांचे उल्लंघन

ज्या चार खासगी इस्पितळातून ‘कोविड’ प्रतिबंधक लस देण्यात आली आहे, त्या यादीची शहानिशा करण्यास माहिती मागवण्यात आली आहे. ही लस ज्या इस्पितळांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले त्‍या कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

गोव्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी

फेसबुक पोस्‍टमुळे बिंग फुटले!

‘गोमेकॉ’ इस्पितळातील कोविड प्रतिबंधक लस देणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस द्यायची आहे, त्यांची यादी तयार केली जाते. या कर्मचाऱ्यांची पूर्ण शहानिशा केली जाते. त्यानंतरच ती दिली जाते. मात्र, खासगी इस्पितळातून आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविली जाते. या कार्यालयातून यादी मंजूर झाल्यानंतर खासगी इस्पितळातून ही लस दिली जाते. मात्र, यादीतील नावे आरोग्य कर्मचाऱ्यांची आहेत की नाही, याची शहानिशा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी करू शकत नाही. त्यामुळे ही कोविड प्रतिबंधक लस देण्यामध्ये बराच गोलमाल झाला आहे. ज्या खासगी इस्पितळातून ही लस दिली गेली आहे, ते इस्पितळाशी संबंधित किंवा जवळची मित्रमंडळीही आहे. काही बिगर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली त्यांनी फेसबुकवर छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्‍यामुळे बिंग फुटले आहे.

संबंधित बातम्या