गोव्यातील 12वींच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा 24 एप्रिल पासून घेण्याचे ठरवले आहे. यासाठीचे वेळापत्रक आज मंडळाने जाहीर केले.

पणजी : गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा 24 एप्रिल पासून घेण्याचे ठरवले आहे. यासाठीचे वेळापत्रक आज मंडळाने जाहीर केले. मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 एप्रिल ला इंग्रजी प्रथम भाषेचा पेपर असेल. पुढील वेळापत्रक असे 27 एप्रिल ऑटोमोबाईल, रिटेल, ब्युटी अँड वेलनेस , कन्स्ट्रक्शन, मीडिया अँड एंटरटेनमेंट, कम्युनिकेशन, लॉजिस्टिक मॅनेजमेंट,  हॉस्पिटॅलिटी व अॅग्रीकल्चर. 28 एप्रिल अर्थशास्त्र 30 एप्रिल सचिव सेवा, 3 मे रसायन शास्त्र, ४ मे समाजशास्त्र, 5 मे बँकिंग, 6 मे मानस शास्त्र , 7 मे भौतिक शास्त्र, इतिहास आणि लेखा. आठ मे कोकणी भाषा दुसरी, 10 मे गणित व राज्यशास्त्र. 11 मे इंग्रजी भाषा दुसरी, उर्दू भाषा दुसरी,संस्कृत भाषा दुसरी, फ्रेंच भाषा दुसरी ,पोर्तुगीज भाषा दुसरी आणि रंगकाम. १२मे हिंदी भाषा दुसरी 13 मे मराठी भाषा 2री, 15 मे जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत 17 मे भूगोल.

संबंधित बातम्या