केंद्र सरकारने राबवलेल्या योजना म्हणजेच आत्मनिर्भर भारत: चंद्रकांत गावस

मुरगाव तालुका हा भविष्यात विकासकामांचे (Development Works) अग्रेसर होणार आहे.
चंद्रकांत गावस यांचे आत्मनिर्भर भारत बद्दल मत
चंद्रकांत गावस यांचे आत्मनिर्भर भारत बद्दल मत Dainik Gomantak

दाबोळी: केंद्र सरकारने (Central Government) देशात राबविलेल्या योजना, विकास म्हणजेच आत्मनिर्भर भारत आहे. भाजप (BJP) हा सर्व धर्मांना घेऊन कार्य करणारा पक्ष असल्याने गोव्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप अवश्य बहुमत प्राप्त करणार आहे. तसेच मुरगाव तालुक्यात पुन्हा एकदा भाजप शंभर टक्के यश संपादन करून राज्यात भाजप सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची प्रतिक्रिया राज्य भाजप कार्यकारी सदस्य तथा गोवा चेंबर ऑफ काँग्रेस कॉमर्सचे लॉजिस्टिक चेअरमन चंद्रकांत गावस (Chandrakant Gavas) यांनी दिली.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्व तर गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी योग्यरीत्या हाताळलेले प्रशासन यामुळेच राज्य विकासाच्या मार्गाने यशस्वीरित्या पुढे जात आहे. यात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे बहुमूल्य योगदान राज्य सरकारला प्राप्त झाले असल्याची माहिती चंद्रकांत गावस यांनी दिली. राज्यात भाजप सरकार असल्यानंतर खऱ्या अर्थाने जनतेला विकास व योजना यांची ओळख प्राप्त झाली.

चंद्रकांत गावस यांचे आत्मनिर्भर भारत बद्दल मत
मांद्रेतील नऊही पंचायतीचे सरपंच, उपसरपंच धरणार मगोची वाट: आरोलकर

राज्यातील एकाही घरात भाजप सरकारने केलेल्या योजना पोचल्या असे नाही, तर याहीपेक्षा जास्त योजना सरकारने सामान्य जनतेला पुरवलेल्या आहे. कोविड-19 महामारीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्याची अर्थव्यवस्था कुमकुवत असतानासुद्धा विकास कामांना व योजनांना अडथळा निर्माण निर्माण होऊ दिला नाही. कारण हे सरकार गोव्यातील सर्वसामान्य जनतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आले असल्याची माहिती चंद्रकांत गावस यांनी दिली.

राज्यात खाण व्यवसाय (Business) बंद झाल्याने सामान्यातील सामान्य व्यक्ती जो खाण व्यवसायातून आपले कुटुंब चालवत होता त्यांना राज्य सरकारने आर्थिक सहकार्य देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुरगाव तालुका हा खाण व्यवसायाचे केंद्रबिंदू असल्याने येथे सुद्धा राज्य सरकारने अर्थसहाय्य (Government funding) पुरवले आहे. राज्यात खाण व्यवसाय सुरू करण्यास डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) अथक परिश्रम घेत असून यांना यश अवश्य प्राप्त होणार असल्याची माहिती चंद्रकांत गावस यांनी दिली. मुरगाव तालुक्यात 2017 विधानसभा निवडणुकीत राज्य भाजपने शंभर टक्के यश संपादन केले होते. त्याची पुनरावृत्ती 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा होणार असल्याची माहिती गावस यांनी दिली. मुरगाव तालुका हा भविष्यात विकासकामांचे अग्रेसर होणार आहे. मुरगाव, वास्को, दाबोळी यंदा भाजप बहुमताने विधानसभा निवडणूक (Election) जिंकणार असल्याची माहिती शेवटी चंद्रकांत गावस यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com