गोव्यातील शाळा बनणार हायटेक

मुख्यमंत्र्यांची घोषणा : कॉम्प्युटिंग डिव्हाईस, व्हर्च्युअल क्लासरुमची मदत
गोव्यातील शाळा बनणार हायटेक
Schools in Goa Dainik Gomantak

पणजी : कोडिंग आणि रोबोटिक्स या तंत्रज्ञानाची मदत घेऊन या शाळा हायटेक बनविण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्यातील सर्व शाळांना या वर्षीपासून मोफत कॉम्प्युटिंग कोडिंग डिव्हाईस देण्यात येणार असून केंद्र सरकारच्या मदतीने लवकरच प्रत्येक शाळेला एक अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरूम बनविण्यात येणार आहे.

तंत्रशिक्षण खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या कोडिंग आणि रोबोटिक्स अभ्यासक्रमाच्या सातवीच्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रम पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगाडे, तंत्र शिक्षण संचालक विवेक कामत, प्रकल्प अधिकारी विजय बोर्जीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘सरकारने कोडिंग आणि रोबोटिक्स अभ्यासक्रम सुरू करून इतर राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. हाच अभ्यासक्रम देशातील इतर राज्ये स्वीकारतील. येत्या काही दिवसात प्रत्येक शाळेला मोफत कॉम्प्युटिंग कोडिंग डिव्हाईस देण्यात येईल त्याद्वारे मुले व्हर्च्युअल पद्धतीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ होणार आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात 15 तरतूद केली आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक शाळेत एक अत्याधुनिक व्हर्च्युअल क्लासरूम मिळावी यासाठी आम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असून लवकरच याची अंमलबजावणी होईल.’

Schools in Goa
गोवा फाऊंडेशनला प्रतिवादी करा; खंडपीठाकडून निर्देश

‘सायबर एज’ योजनेचा गैरवापरच जास्त

राज्यातील मुलांना सायबर एज योजनेतंर्गत लॅपटॉप आणि टॅब देण्यात येत होते. मात्र, याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याच्या अनेक तक्रारी शिक्षण खात्याकडे आल्या होत्या. याशिवाय त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कोणत्या प्रकारचा बदल झाला नसल्याचे जाणवल्याने सायबर एज ही योजना बंद करण्यात आली. यावेळी अनेकांनी सरकारवर टीका केली. मात्र, आता कोडिंग आणि रोबोटिंग योजनेमुळे विद्यार्थी तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर बनतील असा विश्‍वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

विद्या समीक्षा केंद्राची स्थापना

गणित आणि विज्ञान विषयाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारतर्फे विद्या समीक्षा योजना सुरू करणार आहे. याद्वारे शिक्षण संचलनालयातर्फे राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच शिक्षकांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com