डॉ. संगीता साखळकर यांना वैज्ञानिक फेलोशीप

वार्ताहर
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

नवेवाडे-वास्को येथील डॉ. संगीता गुरुदास साखळकर यांना भारतीय नॅशनल सायन्स अकॅडमी (आयएनएसए २०००-२०१२) भारतातील नामांकित संस्था विद्यापीठात संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक फेलोशिप मिळाली आली.

दाबोळी: नवेवाडे-वास्को येथील डॉ. संगीता गुरुदास साखळकर यांना भारतीय नॅशनल सायन्स अकॅडमी (आयएनएसए २०००-२०१२) भारतातील नामांकित संस्था विद्यापीठात संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक फेलोशिप मिळाली आली.

अलीकडेच गोवा सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने डॉ. साखळकर यांची प्राध्यापक म्हणून मान्यता व पदोन्नती केली आहे. त्यांनी आपले शिक्षण वाडेमनगर इंग्लिश हायस्कूल न्यू वाडे, वास्को येथून पूर्ण केले. त्यानंतर एमईएस कॉलेज झुआरीनगर मधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. कार्मेल कॉलेज नुवे मधून बीएस्सी आणि गोवा विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. गोवा विद्यापीठातर्फे फेब्रुवारी २००१ मध्ये ‘प्रकाश संश्लेषणाचे फोटो इनब्रिशन’ आणि ‘ज्वार मधील ऑक्सीडेटिव्ह तणावाविरुद्ध छायाचित्र संरक्षणासाठी झॅन्टोफिल सायकलच्या संभाव्य भूमिका’ या विषयावर त्यांना जीवन विज्ञान व पर्यावरण विभागाचे डिन प्रो. पी. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी देण्यात आली. 

जानेवारी २००२मध्ये लखनऊ येथे यंग सायंटिस्ट अवार्ड प्रेझेन्टेशनसाठी त्यांनी भाग घेतला होता. म्हणून इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये डॉ. ए पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर आणखी एक अनुभव घेण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. डॉ. साखळकर यांनी जर्मनीतील बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट-१  बुर्झबर्ग येथे पोस्ट डॉग संशोधन केले आहे. वर्ष २०००-२००६ मध्ये त्यांना भारत सरकारच्या प्रतिष्ठीत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी- एसईआरबी) विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील युवा वैज्ञानिकांना (बीओवायएससीएएसटी) एक वर्षाची फेलोशिप प्रदान करण्याची संधी युकेला पुरवण्यासाठी हाती दिली.

त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. नमूद केलेल्यापैकी काहीमध्ये प्लांट सायन्स, प्लांट मोल यांचा समावेश आहे. बायोल, करंट सायन्स, इंडियन जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजी, फिकोस नेट आणि ओरिझा इत्यादी त्यांनी डीएसटी (एसईआरबी) प्रमुख संशोधन प्रकल्प आणि युजीसी लघु संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. १९९८ पासून त्या चौगुले महाविद्यालयात कार्यरत आहे. गोवा विद्यापीठाने मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शक असून, पीएचओडी, बोर्ड ऑफ स्टडीज इत्यादीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

डॉ. साखळकर यांनी आपल्या  यशाचे श्रेय पालक, तिचे मार्गदर्शक शिक्षक, हितचिंतक यांना दिले आहे. प्रयोगशाळेच्या पायाभूत सुविधांबद्दल चौगुले महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचेही त्यांनी आभार मानले आहेत.
 

संबंधित बातम्या