थिवीतील अपघातात स्कूटरस्वार ठार

मालवाहू टेम्पो अंगावरून गेल्याने दक्ष गणेश मंडल यांचा मृत्यू
थिवीतील अपघातात स्कूटरस्वार ठार
थिवीतील अपघातात स्कूटरस्वार ठारDainik Gomnatak

म्हापसा: आम्यानी-माडेल, थिवी येथे झालेल्या अपघातात (Accident) मालवाहू टेम्पो अंगावरून गेल्याने दक्ष गणेश मंडल (वय 42, रा. गोठणीचो व्हाळ, कोलवाळ) हा स्कूटरस्वार ठार झाला. ही घटना बुधवारी दुपारी 3.30 वाजण्‍याच्या सुमारास घडली, अशी माहिती कोलवाळ पोलिसांनी दिली‌.

गणेश मंडल हा जीए 03 एबी 0202 क्रमांकाच्या डिओ स्कूटरवरून माडेलहून करासवाडा येथे जात होता, तर एमएच 08 एच 8833 क्रमांकाचा मालवाहू टेम्पो त्याच दिशेने येत होता. आम्यानी येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्‍याचे सांगण्‍यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com