Vishwajit Rane: ऑर्चिड जमिनीच्या रूपांतर चौकशीसाठी नगरनियोजनतर्फे छाननी समिती

वनमंत्री : गैरप्रकारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांचे होणार निलंबन
Vishwajit Rane|Goa News
Vishwajit Rane|Goa NewsDainik Gomantak

Vishwajit Rane प्रादेशिक आराखडा 2021 मधील सुमारे 6 कोटी चौ.मी. जमिनींचे वसाहतीतून ऑर्चिडमध्ये केलेल्या रूपांतराची चौकशी करण्यासाठी नगर व शहर नियोजन खात्यातर्फे छाननी व चौकशी तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे.

ही चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून यात जो अधिकारी, कर्मचारी गुंतलेला असेल त्याला पुढील विधानसभा अधिवेशनापूर्वी निलंबित केले जाईल, असा इशारा नगर व शहर नियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिला.

नगर व शहर नियोजन कायद्याच्या कलम 7 (2) खाली खात्यातर्फे सर्व प्रकरणांची छाननी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Vishwajit Rane|Goa News
Goa ST Community Reservation:...अन्यथा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करू; मेळाव्यातून एसटी नेत्यांचा इशारा

या समितीत पर्यावरण मूल्यमापन समितीचे अध्यक्ष, पर्यावरण शिक्षण केंद्राचे शास्त्रज्ञ, वास्तुविशारद, अभियंते, कायदेतज्ज्ञ, जीसीसीआयचे अध्यक्ष व गोवा सरकारचे अधिकारी यांचा समावेश असेल. प्रादेशिक आराखडा 2021 मध्ये अनेक विसंगती आहेत.

त्यामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागला आहे. मोठमोठ्या मालमत्ता व वसाहतींच्या जमिनी, काही गरीब लोकांच्या जमिनींचा त्यात समावेश आहे.

Vishwajit Rane|Goa News
Goa Crime: पोलिस गोळीबार प्रकरण; संशयित मेरठमध्ये जेरबंद

या जमिनी नैसर्गिक आच्छादन, फळबागा व अविकास उतारांमध्ये रुपांतर करून तर्कशुद्धीकरणाच्या नावाखाली त्यांची जमीन विकसनयोग्य वापरासाठी ठेवण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला आहे, असे राणे म्हणाले.

अन्याय दूर करू : राणे

हे सरकार जनतेचे आहे. त्यामुळे ते लोकांच्या फायद्याचे निर्णय घेईल. त्याचवेळी शाश्‍वतता व संवर्धन सुनिश्‍चित करील. ज्यांच्यावर या प्रादेशिक आराखडा तयार करताना अन्याय झाला आहे तो दूर केला जाईल, असे मत राणे यांनी तपासणी करण्याच्या निर्णयानंतर व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com