मूर्तिकार राजेंद्र नार्वेकर यांचा सत्कार 

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

शेट्येवाडा-म्हापसा येथे पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून चिकणमातीच्या मूर्ती बनवणारे राजेंद्र नार्वेकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन समाजसेवक तथा उद्योजक तारक आरोलकर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

म्हापसा: शेट्येवाडा-म्हापसा येथे पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून चिकणमातीच्या मूर्ती बनवणारे राजेंद्र नार्वेकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन समाजसेवक तथा उद्योजक तारक आरोलकर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ शिक्षक सतीश म्हापसेकर, समाजसेवक अरुण गवंडळकर,  नंदू नागवेकर, समीर नार्वेकर, अनंत नाईक, भानुदास गडेकर, दत्तराज नार्वेकर, दुर्गेश नार्वेकर, लक्ष्मी ऊर्फ संगीता नार्वेकर, कीर्ती नार्वेकर उपस्थित होते.

आरोलकर म्हणाले, मातीपासून मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांची संख्या आता कमी कमी होत आहे. सध्या मोठ्या संख्येने इतर राज्यांतून तयार केलेल्या मूर्ती विकण्यासाठी गोव्यात आणल्या जातात. त्याद्वारे पारंपरिक मूर्तिकारांना चांगल्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत असते. इतर व्यवसायिकसुद्धा अशा मूर्ती मोठ्या प्रमाणात आणत असल्याने गणेशमूर्ती तयार करणारे पारंपरिक कलाकार आज मागे पडले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा गौरव करणे गरजेचे  आहे.

संबंधित बातम्या